कैद्यांचा तुरुंग अधिकाऱ्यावर हल्ला

खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तुरुंग अधिकारी आनंद पानसरे यांनी गुन्हा दाखल केला आहे.

(संग्रहीत छायाचित्र)

कल्याण: आधारवाडी तुरुंगात एका गुन्ह्याच्या प्रकरणात कच्चे कैदी म्हणून दाखल असलेल्या दोन कैद्यांनी तुरुंग अधिकारी आणि  एका पोलिसावर हल्ला केला. तुरुंग अधिकाऱ्याच्या मान आणि पोटावर धारदार पातेने हल्ला केल्याने ते जखमी झाले  आहेत.

खडकपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तुरुंग अधिकारी आनंद पानसरे यांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहम्मद अल्ताफ ऊर्फ मफताब खलीद शेख, अंकित महेंद्र प्रसाद ऊर्फ डिकुश अशी आरोपींची नावे आहेत. तुरुंगाधिकारी पानसरे बुधवारी तुरुंगात  कोठडीबाहेरून जात होते. त्यांना अल्ताफ कोठडीत न थांबता कोठडी बाहेर फिरत असल्याचे दिसले.

त्यांनी त्याला कोठडीत जाण्याची सूचना केली. त्या क्षणी त्याने तुरुंगाधिकारी पानसरे यांच्या मानेवर आणि पोटावर धारदार पातेने हल्ला केला. ते गंभीर जखमी झाले. बाजूला तैनात असलेले शिपाई भाऊसाहेब गंजवे यांनी पानसरे यांना कैद्याच्या तावडीतून सोडविण्याचा प्रयत्न केला. अल्ताफने त्यांच्यावरही हल्ला करून जखमी केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Crime news prison officer attacked by inmates akp

ताज्या बातम्या