कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर गुन्हे | Crimes against 22 Shiv Sena workers including Kalyan Shiv Sena District Chief Vijay Salvi amy 95 | Loksatta

कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर गुन्हे

पाच पेक्षा अधिका नागरिकांनी जमावाने एकत्र येऊ नये असा ठाणे पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश असताना त्या आदेशाचा भंग केला

कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर गुन्हे
कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर गुन्हे

पाच पेक्षा अधिका नागरिकांनी जमावाने एकत्र येऊ नये असा ठाणे पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश असताना त्या आदेशाचा भंग केला म्हणून शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्यासह २२ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलिसांनी मंगळवारी गुन्हे दाखल केले.

हेही वाचा >>> नवरात्रोत्सवातील नऊ दिवस व्यसनमुक्ती अभियान ; डोंबिवलीतील डाॅक्टरचा उपक्रम

जिल्हाप्रमुख विजय सा‌ळवी यांना साहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी ठाणे, मुंबई, रायगड जिल्ह्यातून दोन वर्षापासून तडीपार करण्याची नोटीस बजावली आहे. या नोटिशी विषयी साळवी यांची बाजू मांडण्यासाठी शहरप्रमुख सचीन बासरे यांच्यासह ६० शिवसैनिक रामबाग दत्त मंदिर येथे मंगळवारी सकाळी जमले होते. आपण मनाई आदेशाचा भंग केला आहे, असे महात्मा फुले पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांनी शिवसैनिकांना सांगितले. ते जमावाने महात्मा फुले पोलीस ठाणे येथे पायी आले. शहरप्रमुख सचीन बासरे, माजी आ. रुपेश म्हात्रे, उपनेते इरफान शेख, रवी कपोते, शरद पाटील, विजया पोटे, ॲड. जयेश वाणी यांच्या शिष्टमंडळाने साहाय्यक पोलीस आयुक्त पाटील यांची भेट घेऊन विजय साळवी यांची बाजू तेथे मांडली. साळवी यांच्यावरील सर्व गुन्हे राजकीय स्वरुपाचे आहेत. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. या कारवाईचा विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलीस अधिकाऱ्यांना केली.

हेही वाचा >>> डोंबिवली जवळील २७ गावांमधील २७ विकासकांवर फौजदारी गुन्हे दाखल

तेथून बाहेर पडल्यानंतर मुरबाड रस्त्यावरील आंबेडकर उद्यान येथे बंड्या साळवी यांनी शिवसैनिकांच्या उपस्थितीत आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार घातला. तेथे साळवी यांनी आपल्यावर राजकीय दबावापोटी कारवाई केली जात आहे. पोलिसांच्या कारवाईला आपण न्यायालयात आव्हान देणार आहोत, असे सांगितले. यावेळी शिवसेना झिंदाबादच्या घोषणा शिवसैनिकांनी दिल्या. मनाई आदेशाचा भंग केला म्हणून बंड्या साळवी यांच्यासह २२ शिवसैनिकांवर हवालदार साहेबराव मुठे यांच्या तक्रारी वरुन महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सा‌ळवी यांच्यावर कारवाई करण्यात आल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
कल्याण पूर्वेतील विजयनगर येथील कमानीमुळे वाहन चालक त्रस्त ; एक महिन्यापासून कमान रस्त्यावर

संबंधित बातम्या

हेल्मेट सक्ती योग्य की अयोग्य?
भाईंदर-ठाणे जलवाहतूक लवकरच?
शेतकऱ्यांच्या संपामुळे भाजी-दुधाबरोबर फुलांचे भावही भिडणार गगनाला…
पुष्पक दरोडाप्रकरणी आठही आरोपी अटकेत
लोकसभा निवडणुकीत कल्याणमध्ये भाजपचे कमळ! ; मुख्यमंत्री शिंदे पुत्राच्या मतदारसंघात भाजप आमदाराचा दावा

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार