ठाणे : जिल्ह्यातील ग्रामीण भागात ऑक्टोबर महिन्यापर्यंत ३७ बोगस डॉक्टर आढळून आले आहेत. जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. यातील ३१ डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्हास्तरीय बोगस डॉक्टर शोध पुनर्विलोकन समितीची गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एक बैठक पार पडली.  यावेळी अंबरनाथ, भिवंडी, शहापूर, कल्याण, मुरबाड या तालुक्यातील बोगस डॉक्टरांसंबंधी करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात आला. त्यानुसार समितीने सादर केलेल्या अहवालात ग्रामीण भागात ऑक्टोबपर्यंत ३७ बोगस डॉक्टर आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील ३१ प्रकरणे ही न्यायप्रविष्ट असून ३० बोगस डॉक्टरांनी व्यवसाय बंद केल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crimes bogus doctors rural thane ysh
First published on: 27-11-2021 at 01:07 IST