भगवान मंडलिक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली जवळील २७ गावांमधील विकासकांनी कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. या कागदपत्रांच्या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा प्राधिकरणाची (महारेरा) दिशाभूल करुन त्यांच्याकडून या बेकायदा बांधकामांना रेराची मान्यता असल्याचे दाखवून ग्राहक आणि कल्याण डोंबिवली पालिकेची फसवणूक करणाऱ्या २७ गावांमधील २७ विकासकांविरुध्द बुधवारी रात्री फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.२०१७ पासन ते २०२२ या कालावधीतील या बनावट बांधकाम परवानग्या आहेत. ही बांधकामे नांदिवली पंचानंद, आजदे, निळजे, सोनारपाडा, आडिवली ढोकळी, गोळवली, माणगाव, काटई, सागाव भागातील आहेत. मे. गोल्डन डायमेंशन या वास्तुशिल्पकार कंपनीची सर्वाधिक बेकायदा बांधकामे आहेत.

हेही वाचा >>> भिवंडीत कुंपण भिंत कोसळून पाच जण जखमी

मागील दोन वर्षापूर्वी २७ गावातील नांदिवली गाव परिसरात बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या ७४ जणांच्या विरुध्द उल्हासनगर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे दाखल असताना आता नव्याने २७ भूमाफियांविरुध्द गुन्हे दाखल झाल्याने या विकासकांच्या इमारतीत सदनिका घेऊन राहत असलेल्या रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे. या भूमाफियांनी बेकायदा इमारतीमधील सदनिका २५ ते ३५ लाखापर्यंत ग्राहकांना विकल्या आहेत. बहुतांशी जमिनी सरकारी, पालिका आरक्षित भूखंडांच्या, खासगी मालकीच्या आहेत.

कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत बेसुमार बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या रीतसर परवानग्या घेऊन अधिकृत इमारती बांधणाऱ्या विकासकांवर होत आहे. बेकायदा इमारतीत स्वस्तात घर मिळत असल्याने नागरिकांचा ओढा बेकायदा इमारतींकडे आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वास्तुशिल्पकार संदीप पाटील यांनी २७ गावांमध्ये २७, डोंबिवली शहरात ३९ अशा ६७ विकासकांनी कडोंमपाची बांधकाम परवानगी न घेता बेकायदा बांधकामे केली असल्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात मागील वर्षी दाखल केली आहे. याचिकाकर्ता पाटील यांनी या बोगस बांधकाम परवानगी प्रकरणी पालिका आयुक्त, साहाय्यक संचालक नगररचना यांच्याकडे बनावट बांधकाम परवानग्यांच्या कागदपत्रांसह तक्रार केली होती.

हेही वाचा >>> पालिकेच्या शाळांमध्ये लवकरच सेमी इंग्रजीचा प्रयोग ; अंबरनाथ पालिकेला प्रस्ताव देण्याच्या आमदार डॉ. किणीकरांच्या सूचना

नगररचना विभागाने २७ गावांमधील २७ विकासकांच्या बांधकाम परवानग्या तपासल्या. त्यांना पालिकेने या परवानगी दिले नसल्याचे आढळून आले. साहाय्यक संचालक नगररचना दीक्षा सावंत यांनी साहाय्यक नगररचनाकार सुजीत पानसरे यांना २७ विकासकांविरुध्द गुुन्हे दाखल करण्याचे आदेश मंगळवारी दिले. गुरुवारी रात्री या भूमाफियांवर पालिकेने ग्राहक आणि पालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले.बहुतांशी बांधकामे पालिका प्रभागातील साहाय्यक आयुक्तांच्या आशीर्वादाने उभी राहिली आहेत. ह बांधकामे सुरू असताना फक्त कारवाईच्या नोटिसा पाठवायच्या आणि माफियांशी संगनमत करायचे असे प्रकार साहाय्यक आयुक्तांकडून सुरू आहेत.

हेही वाचा >>> मुंबईतील धोकादायक कचरा पनवेलमध्ये

भूमाफियांची नावे
नकुल गायकर, सुमीत आचार्य, मे. समर्थ डेव्हलपर्स (आजदे गोळवली), वसंत म्हात्रे, सोमनाथ जाधव, मे. बिल्डर्स डेव्हलपर्स (नांदिवली), शांताराम जाधव, देवेंद्र म्हात्रे मे. विनायक कन्स्ट्रक्शन (सोनारपाडा), रामसुरत गुप्ता, आदित्य इन्फ्रा (नांदिवली), देवचंद कांबळे, मे. गोल्डन डायमेंशन (नांदिवली), प्रदीप ठाकूर, प्राची असोसिएशट (गोळवली), चंद्रशेखर भोसले, रुंद्रा इन्फ्रा (नांदिवली), प्रसाद शेट्टी, मे. गोल्डन डायमेंशन, ओम लिलाई बिल्डर्स, राजेश विश्वकर्मा, शंकर तेंडुलकर, तुकाराम पाटील (निळजे), अर्जुन गायकर, राजाराम भोजणे, गोल्डन डायमेंशन (आजदे), अविनाश म्हात्रे, मे. गोल्डन डायमेंशन, बालाजी डेव्हलपर्स (नांदिवली), अशोक म्हात्रे, मे. गोल्डन (नांदिवली), अरुण सिंग, बालाजी डेव्हलपर्स, मे. गोल्डन डायमेंशन (माणगाव), सरबन बिंदाचल, मे. विष्णु शाहु कन्सट्रक्शन, मे. गोल्डन डायमेंशन (माणगाव), संजय जोशी, मे. संस्कार बिल्डकाॅन, मे. गोल्डन डायमेंशन (निळजे), चिराग पाटील (आडिवली), महेश शर्मा, सामी असोसिएट (सोनारपाडा), अमृता दीपक घई, मे विनायक वाटिका बिल्डर्स, शेवंताबाई पाटील, (सोनारपाडा),शांताराम जाधव, देवेंद्र म्हात्रे (सोनारपाडा), मनोहर काळण, मे. शिवसाई बााजी बिल्डकाॅन (आजदे गोळवली), अनिल पाटील, मे. त्रिदल एन्टरप्रायझेस (आडवली), सुभाष नामदेव म्हात्रे, अमीन पटेल (नांदिवली), पूनम पाटील, जडवतीदेवी यादव (सोनरपाडा), सुनील लोहार, पार्वतीबाई काळण (सागाव), शिवसागर यादव, मे. साई बिल्डर्स डेव्हलपर्स (आडवली), निवेश एन्टरप्रायझेस जी. एन. गंधे, राजेश ठक्कर.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Criminal cases filed against 27 developers in 27 villages near dombivli amy
First published on: 28-09-2022 at 13:03 IST