लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : येथील गडकरी रंगायतन नाट्यगृह परिसरात मंगळवार सकाळपासून मराठा समाज बांधव सभेसाठी मोठ्या संख्येने जमले होते. शिवाय, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी शहरात जागोजागी मराठा बांधव जमले होते. हातात भगवे ध्वज घेऊन दुचाकींची रॅली निघाली होती. या दरम्यान, जरांगे यांच्यावर २५ जेसीबीमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. ‘एक मराठा, लाख मराठा’, आरक्षण आमच्या हक्काचे, जय जिजाऊ- जय शिवराय अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या.

BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Sadanand Tharwal Dombivli BJP ravindra chavhan
डोंबिवलीतील ज्येष्ठ शिवसैनिक सदानंद थरवळ यांचे भाजपला समर्थन, शिवसेनाप्रमुखांना अनावृत्तपत्र लिहून व्यक्त केल्या भावना
Badnera Assembly constituency, Bachchu Kadu, uddhav Thackeray group, navneet rana
राणांविरोधात बच्‍चू कडूंची ठाकरे गटाच्‍या बंडखोर उमेदवाराला साथ ; म्‍हणाले, “नेतेच आता खतरे मे…”
Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
campaign will stop today
प्रचारतोफा आज थंडावणार, निवडणूक आयोगाची ‘छुप्या प्रचारा’वर नजर
supriya sule criticizes mahayuti
पूल, इमारती म्हणजे विकास नव्हे! सुप्रिया सुळे यांनी पक्षातील फुटिरांना फटकारले

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी सकाळी ठाण्यातील गडकरी रंगायतन नाट्यगृहात सभा आयोजित करण्यात आली होती. दोन दिवसांपासूनच सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ही सभा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू केले होते. या सभेला समाजबांधवानी उपस्थित रहावे यासाठी शहरभर फलक लावण्यात आले होते. या सभेसाठी शहरातील मराठा समाज बांधव सकाळपासूनच गडकरी रंगायतन परिसरात जमण्यास सुरूवात झाली होती. ‘एक मराठा, लाख मराठा’, आरक्षण आमच्या हक्काचे, जय जिजाऊ- जय शिवराय अशा घोषणा दिल्या जात होत्या. शहरातील मुख्य रस्ते आणि चौक परिसरात जरांगे यांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले होते. सोमवारी रात्री जरांगे पाटील यांची कल्याण शहरात सभा पार पडली. येथूनच ते सकाळी ठाण्याच्या दिशेने निघाले. त्यांच्या स्वागतासाठी खारेगाव टोल नाका परिसरात कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. अनेकजण हातात भगवे झेंडे घेऊन दुचाकींवर होते. येथे जरांगे यांचे वाहन येताच त्यांच्यावर जेसीबीमधून पृष्पवृष्टी करण्यात आली. खारेगाव येथून जरांगे यांच्या रॅलीला सुरूवात झाली. माजिवडा चौकात आली असता, तिथेही त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

आणखी वाचा-डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाटावर पडून पाच प्रवासी किरकोळ जखमी, अति जलद कसारा लोकलमधील प्रकार

पाचपाखाडी भागात रॅली आली असता, येथे मराठा नेत्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. फुगे आकाशात सोडण्यात आले. या फुग्यांवर एक मराठा लाख मराठा असा उल्लेख करण्यात आला होता. येथे मोठ्याप्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. याठिकाणी दोनशे किलो वजनाचा हार त्यांना परिधान करण्यात आला. यानंतर जरांगे यांनी तलावपाळी येथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले. त्यानंतर गडकरी रंगायतन येथे जाऊन मराठा बांधवांशी संवाद साधला. सभास्थळी जरांगे पाटील यांना बसण्यासाठी एक मोठी खुर्ची ठेवण्यात आली होती. जरांगे यांनी तात्काळ ही खुर्ची हटविण्यास सांगितली. त्यानंतर तिथे प्लास्टिकची खुर्ची ठेवण्यात आली. नाट्यगृहात बसण्यासाठी जागा नव्हती इतकी गर्दी झाली होती. यामुळे अनेकजण नाट्यगृहातील जिन्यांवर बसून तर काहीजण उभे राहून त्यांचे भाषण ऐकत होते. आयोजकांनी नाट्यगृहाबाहेर ध्वनीक्षेपक लावला होता, त्याद्वारे अनेकजण जरांगे यांचे भाषण ऐकत होते.