ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवंत पण आर्थिक परिस्थितीने दुर्बल विद्यार्थ्यांना अर्थसाहाय्य करण्यासाठी कल्याण मधील बाईकपोर्ट सायकल गटाने कल्याण ते दिल्ली सायकल स्वारी सुरू केली आहे. शनिवारी सकाळी दुर्गाडी पूल येथून सायकल स्वारांनी शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत सायकल स्वारीला सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण, आदिवासी भागातील ५०१ गुणवंत विद्यार्थ्यांना सायकल स्वारीच्या माध्यमातून जमा होणारा शिष्यवृत्ती निधी वाटप केला जाणार आहे, असे बाईकपोर्ट सायकल गटाच्या डाॅ. रेहनुमा यांनी सांगितले. कल्याण शहरातील १८ जणांचा गट या सायकल स्वारीत सहभागी झाला आहे. हा सायकल प्रवास आठवडाभरा सुरू राहणार आहे. दररोज २०० किलोमीटर अंतर कापण्याचा निर्धार सायकलपटुंनी केला आहे. बहुतांशी सायकलपटू ४० च्या पुढील आहेत. २ डिसेंबर रोजी सायकल स्वार दिल्लीतील इंडिया गेट येथे पोहचतील. या सायकल स्वारीचा समारोप होईल, असे या गटातील सहभागी पोलीस अधिकारी नितीन सूर्यवंशी यांनी सांगितले.

हेही वाचा:ठाणेकरांनो सावधान!; बसमध्ये मोबाईल चोरीचे प्रमाण वाढले

कल्याण पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, बीएनआय संघटनेचे संदीप शहा, रोटरी क्लबचे डाॅ. सुश्रुत वैद्य, कैलास देशपांडे सायकल स्वारांना हिरवा झेंडा दाखविण्यासाठी उपस्थित होते. मागील वर्षी याच सायकल स्वारांनी दिव्यांग्यांच्या अर्थसाहाय्यासाठी कल्याण ते गोवा असा सायकल प्रवास केला होता. सायकल स्वारी बरोबर बाईकपोर्ट सायकल गट सामाजिक कार्यात सक्रिय आहे.

हेही वाचा: विश्लेषण: लहरी हवामानाच्या ठाणे जिल्ह्यात एकही वेधशाळा का नाही? खासगी हवामान अभ्यासकांसमोर कोणत्या समस्या?

ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सामाजिक कार्य करताना बाईकपोर्ट सायकल गटाच्या सदस्यांना ग्रामीण, आदिवासी पाड्यांवरील अनेक शाळकरी मुलांमध्ये गुणवत्ता, विविध प्रकारची कौशल्य असल्याचे त्यांच्यात दिसून आले. परंतु, घरची आर्थिक दुर्बल परिस्थिती आणि मार्गदर्शनामुळे या मुलांना पुढील शैक्षणिक प्रगती अडथळा येत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा मुलांना अर्थसाहाय्य करण्याचा निर्धार बाईकपोर्ट सायकल गटाने केला होता. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी या सायकल स्वारीतून करण्यात आली आहे. सायकल स्वारी सुरू होण्यापूर्वीच बाईकपोर्ट गटाकडे अनेक दात्यांनी सुमारे सात लाखाहून अधिक निधी जमा केला आह

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cycle ride from kalyan to delhi to help weaker students in kalyan tmb 01
First published on: 26-11-2022 at 13:06 IST