दहीहंडीच्या उत्सवाला ठाण्यात उधाण आलं आहे. सोमवारी सकाळपासून कोसळणाऱ्या जलधारांमध्ये बाळगोपाळांनी दहीहंडीचा सराव केला. ठाण्यात यंदा मागील उत्सवापेक्षा वेगळे स्वरूप दिसणार आहे. दिवंगत सेना नेते आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेम्बी नाका येथे फिफाच्या फुटबॉल खेळाची जनजागृती करण्यात येणार आहे. तर वर्तकनगर येथे प्रो कब्बडीप्रमाणे प्रो गोविंदाचे प्रमोशन होणार आहे. मंगळवारी होणारा उत्सवासाठी पोलीस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. उत्सव साजरा करत असताना वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष काळजी आयोजकांनी घेतली आहे.

ठाण्यातील दहीहंडी उत्सवामध्ये दरवर्षी काहींना काही तरी विक्रमच होत असतो. हंडीला ग्लॅमर देणाऱ्या या उत्सवाला ठाण्याने सातासमुद्रापार पोहचवले. ठाण्यातील वर्तकनगर येथील सेनेचे आमदार संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या उत्सवात यापूर्वी २ गोविंदा पथकांनी ९ थर लावून विक्रम केला आहे. तर यंदा याच ठिकाणी प्रो कब्बडीच्या प्रमोशन बरोबरच गोविंदाच्या खेळाची तुलना करण्यात येणार आहे. सेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेम्बी नाक्यावरील हंडीत फिफा वर्ल्डकपची तयारी दाखविण्यात आली. दरवर्षीप्रमाणे सेनेचे विधान परिषद सदस्य रवींद्र फाटक यांच्यावतीने रहेजा कॉम्प्लेक्समध्येहंडी बांधली जाणार आहे. खासदार राजन विचारे यांच्यावतीने देखील जांभळी नाका या ठिकाणी दहीहंडी उभारण्यात आली आहे.

मनसेच्यावतीने देखील भगवती मैदान येथे हंडी उभारण्यात येणार आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी ९ थर लावले होते यंदा त्याच ठिकाणी मुंबईमधील ३ गोविंद पथक १० थर लावणार आहेत. उद्या होणाऱ्या दहीकाला उत्सवसाठी पूर्व द्रुतगती मार्गावरून तीन हात नाका, शहरात येणाऱ्या जड वहानांना निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच शहरातील जांभळी नाका आणि टेम्बी नाका येथे येणाऱ्या वाहनावर निर्बंध घालण्यात आले आहेत. दहीकाला उत्सवाच्या बक्षिसांवर जीसटी सुटलेला नाही. या रकमेवर देखील निर्बंध आहेत.हंडीच्या ठिकाणी सीसीटीव्हीने नजर ठेवण्यात येणार असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी साध्या वेशातील पोलिसही तैणात करण्यात येणार आहेत.

ठाण्यातील दहीहंडी उत्सव

१) टेंभी नाका दहीहडी उत्सव – ठिकाण – टेंभी नाका – आयोजक – एकनाथ शिंदे (पालकमंत्री ठाणे) – या ठिकाणी फिफा फुटबॉलची तयारी

2) ‘महा’दही हंडी उत्सव – ठिकाण – जांभळी नाका -ठाणे – आयोजक – राजन विचारे (खासदार ठाणे) – पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा होणार

३) मनसे दहीहंडी उत्सव – ठिकाण – भगवती विद्यालय – नौपाडा ठाणे – आयोजक – अविनाश जाधव (मनसे ठाणे) – या ठिकाणी मुंबईतील ४ पथक – १० थर लावणार

४) संकल्प मित्र मंडळ- ठिकाण – रहेजा कॉम्प्लेक्स – वागळे इस्टेट ठाणे – आयोजक – रवींद्र फाटक – (आमदार विधान परिषद) – पारंपारिक पद्धतीने साजरी होणार

५) संस्कृती युवा प्रतिष्ठान – वर्तकनगर – आयोजक – प्रताप सरनाईक (आमदार सेना ठाणे) – या ठिकाणी प्रो कबड्डी च प्रमोशंन केल जाणार