scorecardresearch

डोंबिवलीत कोपरमध्ये धोकादायक इमारत कोसळली; रहिवासी तातडीने घराबाहेर पडल्याने जीवितहानी टळली

चाळीस वर्षापूर्वी लोडबेअरींग पध्दतीने बांधलेल्या या इमारतीत नऊ सदनिका आहेत. सहा घरांमध्ये रहिवासी राहत होते.

dangerous building collapsed in kopar in dombivli no casualties reported
डोंबिवलीत कोपरमध्ये धोकादायक इमारत कोसळली.

डोंबिवली – येथील पश्चिमेतील कोपर भागातील लक्ष्मण पावशे हि धोकादायक इमारत मंगळवारी संध्याकाळी अचानक कोसळली. दुमजली असलेल्या या इमारतीत सहा कुटुंब राहत होती. इमारत कोसळण्याचे संकेत मिळताच रहिवासी तातडीने घराबाहेर पडले. त्यामुळे जीवित हानी टळली.

चाळीस वर्षापूर्वी लोडबेअरींग पध्दतीने बांधलेल्या या इमारतीत नऊ सदनिका आहेत. सहा घरांमध्ये रहिवासी राहत होते. घराचे काँक्रीट हळूहळू पडत असल्याचे दिसताच रहिवासी तात्काळ ओरडा करत घराबाहेर पडले. त्यानंतर काही क्षणात इमारत कोसळली.

Flyover at Pardi
नागपूर : पंतप्रधानांच्य हस्ते भूमिपूजन, तरीही उड्डाण पुलाला ९ वर्षांचा विलंब, उद्या होणार वाहतुकीसाठी खुला
Lower Paral Bridge
मुंबई : लोअर परळच्या पुलाची करिरोडकडची बाजू वाहतुकीसाठी खुली, सहापैकी तीन मार्गिका रविवारी सकाळपासून सुरू
thief in 53 cases of theft
पुणे: चोरी, घरफोडी, लुटमारीच्या ५३ गुन्ह्यांतील फरारी चोरटा अखेर जेरबंद
ten foot long python swallowed alive cat in chirner
अजगराने जिवंत मांजर गिळली; लोकवस्ती शिरलेल्या अजगरला सर्प मित्रांकडून जीवदान

हेही वाचा >>> “कल्याण लोकसभा लढविताना नावापुढं…”, श्रीकांत शिंदेंचा राजू पाटलांना टोला

कोपर गावातील नवीन बावडी भागातील वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या इमारतीच्या भागातून मंगळवारी संध्याकाळी पादचाऱ्यांची वर्दळ सुरू असते. सुदैवाने इमारत कोसळण्याच्या कालावधीत तिथे कोणी नव्हते. रहिवाशी इमारतीमधून बाहेर पडल्यानंतर काही क्षणात इमारतीचा एक भाग पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. काँक्रीटचा धुरळा काही वेळ परिसरात पसरला होता. इमारत कोसळताच या रस्त्यावरुन येजा करणाऱ्या पादचारी, वाहन चालकांची पळापळ झाली.

हेही वाचा >>> डाॅ. प्रकाश खांडगे यांना शाहीर कृष्णराव साबळे पुरस्कार; डोंबिवलीत पुरस्कार वितरण सोहळा

धोकादायक इमारत कोसळल्याची माहिती मिळताच ह प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त स्नेहा कर्पे सहकारी कर्मचाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुरक्षेचा उपाय म्हणून काही वेळ या रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, वाहतूक पोलीस, पोलीस दाखल झाले. रात्रीत या इमारतीचा ढिगारा बाजुला करण्याचे काम पालिकेकडून सुरू करण्यात येणार आहे. काही दिवसापूर्वी आयरे गावात धोकादायक इमारत कोसळून दोन जणांचा मृत्यू झाला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dangerous building collapsed in kopar in dombivli no casualties reported zws

First published on: 03-10-2023 at 18:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×