dasara celebrations by passengers at Badlapur railway station | Loksatta

VIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा

बदलापूर रेल्वे स्थानकात लोकलचे पूजन करून महिलांना काही मिनिटांसाठी ठेका धरत भोंडला खेळला.

VIDEO : बदलापूर रेल्वे स्थानकात रंगला भोंडला; प्रवाशांनी लोकलची सजावट करत साजरा केला दसरा
रेल्वे स्थानकात पुन्हा रंगला भोंडला

रेल्वे प्रवाशांसाठी लोकल रेल्वेप्रती ऋण व्यक्त करण्याचा सोहळा म्हणून दसऱ्याच्या आदल्या दिवसाकडे पाहिले जाते. मंगळवारी दसऱ्याच्या आदल्या दिवशी बदलापूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांनी उत्साहात दसरा साजरा केला. सकाळी साडेपाच वाजल्यापासून बदलापूर रेल्वे स्थानकात येणाऱ्या लोकल प्रवासी संघटनांकडून सजवल्या जात होत्या. बदलापूर रेल्वे स्थानकात लोकलचे पूजन करून महिलांना काही मिनिटांसाठी ठेका धरत भोंडला खेळला. यावेळी मोटरमन, स्थानक व्यवस्थापक, रेल्वे पोलिसांचा सत्कार करण्यात आला.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2022/10/WhatsApp-Video-2022-10-04-at-9.30.20-AM.mp4

हेही वाचा- उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद

मुंबई आणि परिसरातील लोकांसाठी लोकल ट्रेन ही लाईफलाईन आहे. दररोज मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ८० लाखांपेक्षा जास्त लोकं प्रवास करतात. ही लोकल ट्रेन या लाखो लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनून गेली आहे. म्हणूनच दसऱ्याच्या आधी एक दिवस लोकल ट्रेन सजवत, तिची पूजा करत करण्याची प्रथा गेली अनेक वर्षे सुरु आहे. म्हणूनच आज मुंबई आणि परिसरातील सर्वच लोकल ट्रेन अशा सजलेल्या बघायला मिळत आहेत.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
उद्या दुपारपासून ठाण्यात अवजड वाहतूक बंद

संबंधित बातम्या

डोंबिवलीतील ३८ बेकायदा इमारतींमधील एक हजार सदनिकांचे खरेदी-विक्री व्यवहार रोखले
ठाणे, नवी मुंबई, विरारमध्ये म्हाडाची दोन हजार घरे; येत्या १० दिवसांत जाहिरात, सोडत लवकरच
कल्याण बदलापूर राज्यमार्गावर खोदकामाचा अडथळा,वाहतूक कोंडी भर
Thane vidhan parishad election result: ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत रवींद्र फाटक विजयी
माथेरानच्या रुंद रस्त्यासाठी २०० झाडांची कत्तल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
बापरे! बाळाने खेळणं समजून किंग कोब्राची मान धरली, काही सेकंदातच असं घडलं…; Video होतोय Viral
दोन लाख ८१ हजार मतदारांची नावे वगळली; पुणे जिल्ह्यातील २१ मतदार संघांतील मतदारांची संख्या ७८ लाख ७६ हजार
“जर चिनी आणि कोरियन करू शकतात तर आपण…” रौप्य पदाकामागील वेदनेच्या झालरवर मीराबाई चानूचा हुंकार
“त्याच्यावर माझा काहीच कंट्रोल नाही…” केदार शिंदे यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
Khakee वेब सीरिजचे ‘रीअल हिरो’ सस्पेंड; आयपीएस अमित लोढांवर भ्रष्टाचाराचे आरोप!