ठाणे : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर परिसरात गेल्या शुक्रवारी चार-पाच वर्षांच्या मादी बिबट्याचा मृतदेह सापडला. उद्यानातील अधिकारी-कर्मचाऱ्यानी मृतदेह ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन केले. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात नमुद करण्यात आले आहे, अशी माहिती उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे येथील येऊर परिसरात लोकमान्य नगर वसाहतीच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे. वन्य कर्मचारी २५ नोव्हेंबर रोजी गस्तीवर असताना त्यांना लोकमान्य नगर वसाहतीपासून दोन किमी अंतरावर वन हद्दीमध्ये मादी बिबट्याचा मृतदेह आढळला. एक-दोन दिवस आधीच बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याचा मृतदेह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे उघड आहे, अशी माहिती उद्यानातील अधिकाऱ्यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death female leopard sanjay gandhi national park yeur forest area park thane news ysh
First published on: 30-11-2022 at 10:43 IST