scorecardresearch

खळबळजनक! पाण्याच्या टाकीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह

या घटनेप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खळबळजनक! पाण्याच्या टाकीत आढळला कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह
प्रतिनिधिक छायाचित्र : लोकसत्ता

ठाणे : वागळे इस्टेट येथील कामगार रुग्णालय परिसरात वापरात नसलेल्या पाण्याच्या टाकीत एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कामगार रुग्णालयामागील भागात एक वापरात नसलेली पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीत मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांना आढळून आले. घटनेची माहिती वागळे इस्टेट पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस,  ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. पथकाने टाकीमधील पाणी उपसल्यानंतर मृतदेह टाकीतून बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने अद्याप मृताची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 19:42 IST

संबंधित बातम्या