कल्याण – डब्ल्यू.आर. पी. एफ.ची अशिया चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच दिल्ली विद्यापीठाजवळील शहा एडिटोरिअममध्ये पार पडली. या स्पर्धेत डोंबिवली, कल्याणमधील खेळाडुंनी ३०, तर महाराष्ट्राच्या विविध भागातील स्पर्धकांनी एकूण ५५ सुवर्णपदके पटाकवून राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या स्पर्धेत अशिया खंडातील एकूण २५२ स्पर्धक सहभागी झाले होते. पाच देशांमधील या स्पर्धकांमध्ये महाराष्ट्रातील ३१ स्पर्धक होते.

डोंबिवलीतील पाॅवर लिफ्टिंगचे प्रशिक्षक समीर जोगळेकर यांनी मास्टर दोनमध्ये ६७.५ वर्गात फूल पाॅवर लिफ्टिंग, पुशपूल, स्कॉट, बेंच, डेड लिफ्ट या स्पर्धेमध्ये पाच सुवर्णपदके पटकवली. कल्याणचे शंकर ठाकूर यांनी तीन सुवर्ण, एक चांदीचे, गिरजेश रजक यांनी वरिष्ठ वर्गात मध्ये एक चांदी, चार सुवर्ण पदके पटकावली. मुंबईचे मास्टर्स एक महिलांमध्ये नीता नवार यांनी तीन सुवर्ण, सरिता कदम यांनी तीन सुवर्ण पदकांचा मान मिळवला.

वृंदा राणे चार सुवर्ण, एक रौप्य, दीपा देढिया एक रौप्य, एक सुवर्ण, पंकज पाटील पाच सुवर्ण, अनिकेत अडसूळ यांनी ज्युनिअर मध्ये दोन सुवर्ण पदके व एक रौप्य पदक मिळवले. सुजित जाधव यांनी दोन रौप्य, एक सुवर्ण, भांडुपची पूर्वजा गीरकर हिने ज्युनियर महिला गटात ५२ किलो वजनी गटात पाच सुवर्णपदके पटकावली. पुण्याचा वैभव मोहिते यांनी दोन सुवर्ण व दौन रौप्य, आदेश बनकर, सिद्धार्थ सरवडे यांनी तीन सुवर्ण पदके, सोहम ठाकूर एक सुवर्ण, दोन रौप्य पदके, सचिन थोरात यांना फोर्थ प्लेस मिळाली. सीमा कोल्हापूर यांनी मास्टर दोनमध्ये सुवर्णपदक, योगेश जांभुळकर यांनी दोन कास्यपदक व एक सुवर्णपदक पटकावले.

राजेश्वर धोत्रे यांनी दोन सुवर्णपदके, जीवन मसूद नीरज यादव यांनी एक सुवर्णपदक, कैलास मुनीर यांनी दोन सुवर्ण पदके, राज बब्बर यांनी सीनियरमध्ये एक, रौप्य एक, एक कास्य पदक, राज लवांडे यांनी पाच सुवर्णपदक, ऋषी कपूर याने तीन सुवर्णपदके पटकावली.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील ३१ खेळाडूंनी सहभाग घेतला, महाराष्ट्र संघाची व्यवस्थापक म्हणून सौरभ चौधरी, महाराष्ट्रचे प्रशिक्षक समीर जोगळेकर यांनी जबाबदारी पार पाडली. राज्यातील सर्व विजेत्या स्पर्धकांचे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्या कार्यालयात स्वागत केले. आणि पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पाॅवर लिफ्टिंगचे प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडुंसाठी डोंबिवली, कल्याण परिसरात सुसज्ज व्यवस्था उभी करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी दिले आहे.