ठाणे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील ५७ वर्षीय अंगरक्षक विजय शंकर सांगडे यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. विजय सांगडे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कल्याण नियंत्रण कक्षात कार्यरत होते. सध्या ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यामध्ये त्यांचे अंगरक्षक म्हणून नेमणुकीस होते.
कोर्ट नाका येथील शासकीय विश्रामगृहात असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला. सध्या त्यांचा मृतदेह ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे. घटनास्थळी नौपाडा पोलिसांचे पथक दाखल आहेत. मूळचे जुन्नर येथील असलेले सांगडे यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या सहकाऱ्यांना अश्रू अनावर झाले. ठाणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकारी थोड्याच वेळात शासकीय रुग्णालयात पोहचत आहेत. त्यांच्यावर जुन्नर येथे अंत्यसंस्कार होणार असल्याचे कळते आहे.
