मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार असून राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नाही. परंतु त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेणार आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी ठाण्यात केले.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिका आयुक्तांचे झिंगाट गाण्यावर नृत्य ; नगरविकास प्रधान सचिवांकडे तक्रार

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची पत्नी अमृता यांनी सोमवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीचे दर्शन घेतले. देवी दर्शनानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी शिवसेना -भाजपा युतीचे सरकार स्थापन केले असून या सरकारच्या माध्यमातून लोकहिताचे काम करण्यासाठी देवीकडे शक्ती मागितली, असेही त्यांनी सांगितले. आपला महाराष्ट्र चिंतमुक्त व्हावा आणि ज्या काही समस्या आहेत, त्या दूर करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे, असे मागणे देवीकडे मागितल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही कायदा सुव्यवस्था चोख ठेवणार असून राज्यातील विविध भागातून येणाऱ्या लोकांपासून काहीच अडचण नाही. परंतु त्या गर्दीचा फायदा घेऊन कोणी चुकीचं काम करू नये म्हणून आम्ही काळजी घेणार आहेत, असेही ते म्हणाले.