scorecardresearch

देवीचा मंडप शक्तिप्रदर्शनाची नव्हे तर, मनोभावे पूजा करण्याची जागा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला

देवीचा मंडप शक्तिप्रदर्शनाची नव्हे तर, मनोभावे पूजा करण्याची जागा आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

देवीचा मंडप शक्तिप्रदर्शनाची नव्हे तर, मनोभावे पूजा करण्याची जागा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटाला टोला
एकनाथ शिंदे ( ट्विटर )

ठाणे : देवीचा मंडप शक्तिप्रदर्शनाची नव्हे तर, मनोभावे पूजा करण्याची जागा आहे, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.  ठाणे येथील टेंभीनाक्यावरील नवरात्रोत्सवाला शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी गुरुवारी भेट दिली. या वेळी कार्यकर्त्यांनी महाआरती करत एकप्रकारे शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी कुटुंबीयांसह देवीची पूजा करून महाआरती केली. यावेळी वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते. महाआरतीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी सुसंगत भूमिका घेऊन पुढे जात आहोत, आणि त्यामुळेच राज्यातील प्रत्येक घटक या भूमिकेला समर्थन देत असल्याचा दावा त्यांनी केला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या