ठाणे खाडीतून अवैधरित्या वाळूउपसा करणाऱ्या माफियांविरूद्ध जिल्हा प्रशासनाकडून मागील दोन दिवसांपासून धडक कारवाई सत्र राबविण्यात येत आहे. या कारवाई आतापर्यंत माफियांचा सुमारे १ कोटी ३० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर, डोंबिवली, कल्याणमध्ये शुक्रवारी तर भिवंडी परिसरातील खारबाव, पायगाव, चिंबिपाडा, कोन, वेहेले, अंजुर येथील खाडीत शनिवारी कारवाई करण्यात आली. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईमुळे वाळूमाफियांचे धाबे दणाणले आहेत.

हेही वाचा >>> ठाणे : सरकार प्रलोभन आणि दडपशाहीने काम करत आहे ; खासदार सुप्रिया सुळे यांची केंद्र आणि राज्यशासनावर टीका

Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
Border march canceled in Ladakh Determined to continue peaceful protests
लडाखमधील ‘सीमा मोर्चा’ रद्द; शांततापूर्ण निदर्शने सुरू ठेवण्याचा निर्धार
pimpri chinchwad cp vinay kumar choubey marathi news
पिंपरीत ‘चौबे पॅटर्न’, पोलीस आयुक्तांनी ३९ आरोपींवर लावला मोक्का; आतापर्यंत एकूण ३९६ आरोपींवर कारवाई
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

ठाणे जिल्ह्यातील वाळूचा शासकीय लिलाव बंद झाल्यापासून माफियांकडून जिल्ह्यातील खाडी आणि नदी पात्रातून मोठया प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जात होता. याबाबात लोकसत्तामध्ये वारंवार वृत्त देखील प्रसारित केले जात होते. यानंतर जागे झालेल्या जिल्हा प्रशासनाने मागील काही दिवसांपासून वाळूमाफियांच्या विरोधात धडक कारवाई करण्यास  सुरवात केली आहे. याच अंतर्गत जिल्हा प्रशासनातर्फे शुक्रवारी आणि शनिवारी विविध ठिकाणी माफियांविरोधात कारवाई करण्यात आली. शुक्रवारी महसुल विभागाने केलेल्या  कारवाईत वाळू माफियांचे संक्शन पंप गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले तर बार्जच्या इंजिनमध्ये साखर टाकून ती निकामी करण्यात आली.  निकामी करण्यात आलेल्या दोन्ही बार्जची अंदाजे किंमत ४० लाख तर दोन्ही संक्शन पंपांची अंदाजे  १० लाख रुपये अशा एकूण अंदाजे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. तर रेतीबंदर येथे केलेल्या कारवाईत १३० ब्रास रेती नष्ट केली आहे. याबरोबरच ९७ ब्रास रेती  व ७८ ब्रास दगड पावडर जप्त केली आहे.  ठाणे जिल्हा प्रशासनाचे रेतीगट विभागाचे अधिकारी, उप विभागीय अधिकारी आणि तहसीलदार कार्यालयांमार्फत ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा >>> कल्याण डोंबिवली पालिकेचा सुरक्षा अधिकारी लाच घेताना अटक

नऊ महिन्यात ४६ कारवाया जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत मागील नऊ महिन्यांच्या कालावधीत ११ हजार ८२४ वाहनांची महाखनिज प्रणालीवर ऑनलाइन तपासणी करण्यात आली. त्यातील १९५ वाहनांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्याकडून रुपये २ कोटी ८६ लाख ५३ हजार रूपये इतका दंड वसुल करण्यात आला आहे. तर या काळात वाळू माफियांविरोधात आतापर्यंत ४६ कारवाया करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६३ सक्शन पंप, दोन बार्ज आणि ३ हजार ७४६ ब्रास रेतीसाठा जप्त करून त्याचा लिलाव करण्यात आला आहे.