scorecardresearch

कल्याणमध्ये वाहनाखाली श्वान चिरडून ठार

गोदरेज हिल या उच्चभूंची वस्ती असलेल्या भागात एक भरधाव वाहनचालकाने एका पाळीव श्वानाला जोरदार धडक दिल्याने वाहनाखाली चिरडून श्वानाचा जागीच मृत्यू झाला.

Dog died Kalyan
कल्याणमध्ये वाहनाखाली श्वान चिरडून ठार (प्रातिनिधिक छायाचित्र)

कल्याण – येथील गोदरेज हिल या उच्चभूंची वस्ती असलेल्या भागात एक भरधाव वाहनचालकाने एका पाळीव श्वानाला जोरदार धडक दिल्याने वाहनाखाली चिरडून श्वानाचा जागीच मृत्यू झाला. रोजाली गृहसंकुलाच्या प्रवेशव्दारावर बुधवारी ही घटना घडली आहे. वाहन चालकाविरुद्ध खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा – ठाणे पालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागात नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती; आहेर याचे स्थावर मालमत्ता विभागात परतीचे दरवाजे बंद

हेही वाचा – तटरक्षक दलाने ताब्यात घेतलेली बोट भाईंदरची; बोटीत पाकिस्तांनी नागरिक असल्याची केवळ अफवा

सुहास रेड्डी (३५, रोजाली गृहसंकुल, गोदरेज हिल, कल्याण) असे वाहनचालकाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, बुधवारी सकाळी सुहास यांच्या काकाला हदयविकाराचा धक्का आला होता. सुहास यांनी त्यांना जवळच्या रुग्णालयात वाहनाने दाखल केले. तेथून घरी वाहनाने परत येत असताना त्यांच्या वाहनाखाली रोजाली गृहसंकुलातील पाळीव श्वान आला. तो चाकाखाली चिरडून ठार झाला. ही घटना या भागातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पोलिसांनी चंदन शेदारपुरी यांच्या तक्रारीवरून प्राण्यांच्या जीविताला धोका कायद्याने सुहास रेड्डी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रोजाली गृहसंकुलातील रहिवासी या श्वानाची नियमित काळजी घेत होते. ब्रुजो असे लाडाने रहिवासी त्याला हाक मारत असत. ब्रुजोच्या जाण्याने रहिवाशांनी दुख व्यक्त केले आहे.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-04-2023 at 17:40 IST

संबंधित बातम्या