scorecardresearch

डोंबिवलीत लोढा कासारिओ गोल्डमध्ये वाहनाच्या धडकेत पाळीव श्वानाचा मृत्यू

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील लोढा कासारिओ गोल्ड गृहसंकुलात एका वाहन चालकाने सोसायटीच्या आवारातील एका पाळीव श्वानाला ठोकर दिल्याने श्वानाचा जागीच मृत्यू झाला.

car hit pet dog
डोंबिवलीत लोढा कासारिओ गोल्डमध्ये वाहनाच्या धडकेत पाळीव श्वानाचा मृत्यू (प्रातिनिधिक फोटो)

कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील लोढा कासारिओ गोल्ड गृहसंकुलात एका वाहन चालकाने सोसायटीच्या आवारातील एका पाळीव श्वानाला ठोकर दिल्याने श्वानाचा जागीच मृत्यू झाला. या श्वानाच्या काळजी वाहक महिलेने याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.

हेही वाचा >>>ठाकुर्लीत सामूहिक बलात्कार; दोन आरोपींना अटक

लोढा कासारिओ गोल्डमधील एक्झाॅर्टिका संकुलात इंद्रजित लोटे या गृहिणी आपल्या कुटुंबासह राहतात. सोसायटीच्या आवारात एक श्वान नेहमी वावरत असतो. त्या श्वानाला इंद्रजित (२८) यांनी फ्लॅंटी ब्लॅन्की नाव ठेवले आहे. त्याची दैनंदिन देखभाल, खाणे, लसीकरण इंद्रजित नियमित करतात. सोसायटीत डाॅग लव्हर्स नावाचा व्हाॅट्सप ग्रुप आहे. त्याच्यावर सर्व सदस्य श्वानांची देखभाल याविषयी व्यक्त होत असतात.

हेही वाचा >>>डोंबिवली- ठाकुर्ली सामुहिक बलात्कारातील दोन आरोपी अटक

गेल्या गुरुवारी लोढा कासारिओ गोल्डमध्ये श्वानांच्या लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होता. इंद्रजित लोटे त्या ठिकाणी होत्या. लसीकरणाच्या ठिकाणी सोसायटीचा सुरक्षा रक्षक आला. त्याने इंद्रजित यांना आपल्या सोसायटीच्या तळमजल्याला असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी एमएच-४३-एएम-९०७० या वाहनाच्या चालकाने एक काळ्या श्वानाच्या पायावरुन वाहन नेले आणि वाहनाची श्वानाच्या पोटाला धडक बसल्याने निपचित पडला आहे, अशी माहिती दिली. इंद्रजित यांनी तात्काळ वाहनतळाच्या ठिकाणी जाऊन पाहिले तर पाळीव फ्लॅटी ब्लॅंन्की निपचित पडला असल्याचे दिसले. श्वान प्रेमींनी तात्काळ फ्लॅंटी ब्लॅंन्की श्वानाला वाहनातून श्वानांच्या डाॅक्टरकडे नेले. श्वानाची कोणतीही हालचाल होत नसल्याने आणि त्याला वाहनाची जोरदार धडक बसल्याने तो जागीच मरण पावला आहे, असे डाॅक्टरांनी प्राणी प्रेमींना सांगितले. इंद्रजित लोटे यांनी वाहन चालका विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 11:27 IST

संबंधित बातम्या