वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवली व कल्याण पूर्व भागातील काही भागाचा वीजपुरवठा बुधवारी, गुरुवारी सकाळी ते दुपारीपर्यंत काही वेळ बंद ठेवण्यात येणार आहे. वीज ग्राहकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

डोंबिवलीतील रामनगर फिडरवरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रोड, राजाजी रोड, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रोड, आयरे गाव या भागात बुधवारी (२० एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद असेल.

Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
panvel, water shortage, water shortage in Karanjade, Karanjade, water shortage on gudhipadwa, protest for water shortage, Karanjade citizens, panvel citizens, marathi news,
पनवेल : करंजाडेतील रहिवासी अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे चिंतेत
A decrease in the supply of new houses was recorded in eight metros of the country print news
नवीन घरांच्या पुरवठ्यात घट, यंदा पहिल्या तिमाहीत ६९ हजारांवर; गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के कमी
tuberculosis tb patients marathi news, pm narendra modi tb medicines marathi news
औषधांच्या तुटवड्यासंदर्भात क्षयरुग्णांचे पंतप्रधानांना पत्र

दत्तनगर फिडरवरील स्वामी शाळा, कॉमर्स प्लाझा, टिपटॉप कॉर्नर, जूना आयरे रोड, फाटकवाडी, दत्तनगर, संगितावाडी, दत्त चौक, शिवमंदिर रोड, डीएनसी कॉलेज, नांदिवली रोड, व तुकाराम नगर फिडरवरील आयरे रोड, तुकाराम नगर, सुदामवाडी, आयरे नगर, पाटकर शाळा या भागात गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

कल्याण पूर्वमधील आजदे फिडरवरील आजदे, पाथर्ली, सागर्ली, एमआयडीसी कॉलनी, आजदेपाडा, जिमखाना रोड, शेलार नाका, इंदिरा नगर झोपडपट्टी, रेल्वे कॉलनी, त्रिमुर्ती नगर झोपडपट्टी भागात बुधवारी (२० एप्रिल) आणि २२ केव्ही टेम्पो नाका फिडर व २२ केव्ही एमआयडीसी फिडर क्रमांक ११ वरील एमआयडीसी फेज दोनमधील अंशत: काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी (२१ एप्रिल) सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या स्वंयचलित प्रणालीमार्फत संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे वीज बंदबाबत पूर्वकल्पना देण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.