डोंबिवली : पादचाऱ्याच्या हातातील मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने ९ महिन्यांच्या साध्या कारावासाची आणि १ हजार रुपये रोख दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास १० दिवस आणखी साध्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. सुरज पटिया नट (२०वर्षे) असे या चोरट्याचे नाव आहे. विष्णुनगर पोलिसांनी गेल्या सात महिन्यापूर्वी त्याला अटक केली होती. तेव्हापासून तो कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कच्चा आरोपी म्हणून दाखल आहे.

डोंबिवली पश्चिमेला पादचाऱ्यांकडील २ मोबाइल या चोरट्याने लांबविले होते. या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हवालदार निवृत्ती नाईकरे यांनी तपास करत सूरजला १७ जून २०२१ रोजी अटक केली होती. या प्रकरणी कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.

murder of girlfriend, mumbai,
मुंबई : प्रेयसीच्या हत्येप्रकरणी ३० वर्षीय व्यक्तीला अटक
father beaten
वसई : मुलीचे अपहरण केल्यानंतर पित्याला बेदम मारहाण, नया नगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार निवृत्ती नाईकरे, न्यायालय पोलीस समन्वयक एस. सी. रोंगटे, जी. एम. महाले, के. के. शेख, तसेच सरकारी वकील भिंगारदेव यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. आरोपी सुरज नट याला प्रथम वर्ग चौथ्या न्यायालयाच्या न्यायाधिशांनी सोमवारी शिक्षा ठोठावली.