scorecardresearch

डोंबिवलीचा पाणीपुरवठा उद्या बंद

डोंबिवली शहराला उल्हास नदी काठच्या मोहिली येथील उदंचन केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो.

डोंबिवली : डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाचा पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय कल्याण डोंबिवली पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने घेतला आहे. सोमवारी सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत डोंबिवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे, असे पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी सांगितले.

डोंबिवली शहराला उल्हास नदी काठच्या मोहिली येथील उदंचन केंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. हे पाणी १४०० मिलीमिटर व्यासाच्या जलवाहिनीतून मोहिली येथून नेतिवली येथील टेकडीवरील जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. नेतिवली टेकडीवरील जलशुद्धीकरणातील पाणी डोंबिवली पूर्व, पश्चिम भागाला दररोज पुरवठा केला जाते. या जलवाहिनीत काही तांत्रिक बिघाड असल्याने ते दुरुस्त आणि देखभालीचे काम सोमवारी करण्यात येणार आहे. त्यामुळे या वाहिनीवरील पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dombivali water supply to be cut off tomorrow akp

ताज्या बातम्या