मागील ४० वर्ष कल्याण मधील पत्रीपुला जवळील कुष्ठरुग्ण वसाहतीत कुुष्ठरुग्णांच्या उत्कर्षासाठी कार्य करणारे पद्मश्री गजानन माने यांना डोंबिवली भूषण पुरस्कार, नाशिक येथील स्मार्ट चुडामणी पंडीत शांताराम भानोसे यांना याज्ञवल्क्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. येथील शुक्ल यजुर्वेदिय माध्यंदिन ब्राह्मण संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो.डोंबिवलीतील ज्ञानेश्वर मंगल कार्यालयात हा कार्यक्रम शनिवारी आयोजित केला होता. यावेळी प्रवचनकार सु. ग. शेवडे, संस्था अध्यक्ष प्रदीप जोशी, कार्याध्यक्ष सु. ग. शेवडे, विश्वस्त अध्यक्ष मधुकर कुलकर्णी, मुकुंद जोशी, चिटणीस यतीन पाठक उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>सूर्योदय, सूर्यास्ताच्या वेळेत पथदिवे चालू होत नसल्याने कल्याण-डोंबिवलीत नागरिकांचा अंधारातून प्रवास

डोंबिवली, कल्याण सारख्या सारस्वतांच्या नगरीत विविध प्रकारचे विविध क्षेत्रात कार्य करणारे नागरिक राहतात. आदिवासी, दुर्गम, शैक्षणिक, सामाजिक, अंध-दिव्यांगांसाठी समर्पित भावाने काम करणारे अनेक कार्यकर्ते डोंबिवलीत आहेत. तरी याज्ञवल्क्य, स्मार्त चुडामणी या मानाच्या पुरस्कारांसाठी नामांकने डोंबिवली, कल्याणमधून न येता राज्याच्या विविध भागातून का येतात, असा प्रश्न येथील शुक्ल यजुर्वेदिय माध्यमंदिन ब्राह्मण संस्थेचे कार्याध्यक्ष सुधीर बर्डे यांनी येथे केला. डोंबिवली परिसरातून या पुरस्कारांसाठी मानांकने आली पाहिजेत, असे बर्डे म्हणाले.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत फेरीवाले हटविण्यासाठी अतिक्रमण उपायुक्तांचे विशेष कारवाई पथक

शाल, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आपला पारंपारिक वारसा पुढे नेण्यासाठी ज्ञान, संस्कार, संस्कृती ही खूप महत्वाची साधने आहेत. या वाटचालीतून प्रत्येकाने पुढचा प्रवास केला पाहिजे. कोण कसा राहतोय यापेक्षा कोणाचे विचार काय पध्दतीचे याचा विचार करा.महाविद्यालयीन जीवनापासून आपण धोतर, पैरण, टोपी हा पेहराव ठेवला. हा पोशाख देश, विदेशात, कार्यात कधी अडसर आला नाही, असे शेवडे यांनी सांगितले.कुष्ठरुग्णांच्या सेवेमुळे तेथील जीवन जवळून बघता आले. प्रत्येकाने या सेवेचा वाटा उचलला पाहिजे. म्हणजे समाज सेवा काय असते याचे भान प्रत्येकाला येईल, असे माने म्हणाले.संस्कृत पंडीत केशव भगत (१०४) यावेळी उपस्थित होते. त्यांचा यावेळी शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli bhushan award to gajanan mane a leper patient from dombivli amy
First published on: 29-03-2023 at 14:56 IST