डोंबिवली : डोंबिवली, भिवंडी परिसरात रात्रीच्या वेळेत सोसायटीच्या बाहेर उभ्या केलेल्या दुचाकी चोरणाऱ्या एका १९ वर्षाच्या चोरट्याला रामनगर पोलिसांच्या पथकाने अंबरनाथ शहरातील भवानी चौक भागातून अटक केली. त्याने तीन वाहने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

अनुराग उर्फ गुड्ड्या विजय अडारी (१९, रा. वरचा पाडा, दत्त मंदिराजवळ, भवानी चौक, अंबरनाथ पश्चिम) असे आरोपीचे नाव आहे. त्याने एक लाखाहून अधिक किमतीची वाहने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. डोंबिवलीतील पेंडसेनगर मध्ये राहणारे दिलीप मराठे या सेवानिवृत्तांची दुचाकी गेल्या आठवड्यात सोसायटी समोरुन चोरीला गेली होती.

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
pune car fire marathi news, pune tempo fire marathi news
पुणे: मुंढव्यात वाहनांना आग; वाहने पेटविल्याचा संशय
Panvel, Violent Clash, Erupts, between two groups, Police Attacked, near karanjade colony, fir register, against 18, crime news,
पनवेल : रंगपंचमीत दोन गटातील हाणामारीत पोलिसांना धक्काबुक्की

हेही वाचा >>> डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाला ‘राजकीय’ टपऱ्यांचा विळखा, पालिका अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याची बदलीची धमकी

मराठे यांनी रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली होती. पोलिसांनी या दुचाकी चोरीचा तपास सुरू केला होता. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांना ही चोरी अंबरनाथ येथील अनुराग या सराईत चोरट्याने केल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी अंबरनाथ येथे जाऊन अनुरागला सोमवारी अटक केली. त्याच्याकडून चोरीच्या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> डोंबिवली रेल्वे स्थानकातील लोकल वेळ दर्शक सव्वा तास बंद

रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, साहाय्यक पोलीस निरीक्षक बळवंत भराडे, योगेश सानप, हवालदार विशाल वाघ, प्रशांत सरनाईक, सुनील भणगे, सचिन भालेराव, शेखर कोळी, हनुमंत कोळेकर, शिवाजी राठोड, तुळशीराम लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.