डोंबिवली – येथील ज्येष्ठ दंतशल्यविशारद डाॅ. अरुण नाटेकर यांना ब्राह्मण सभा डोंबिवली शाखेतर्फे दिला जाणारा धन्वंतरी पुरस्कार, तर ज्येष्ठ कर्करोगतज्ज्ञ डाॅ. अविनाश तळेले यांना भिषग्वर्य पुरस्कार जाहीर झाला आहे.
या पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, ६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर रस्त्यावरील ब्राह्मण सभेच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन डाॅ. रविन थत्ते, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष तथा उपमहापौर राहुल दामले, वैद्यकीय सेवा समिती प्रमुख डाॅ. मेघा ओक, कार्याध्यक्ष संजय कानिटकर, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ. विनय भोळे उपस्थित राहणार आहेत.
धन्वंतरी पुरस्काराचे पुरस्कर्ते दिवंगत विश्वनाथ केशव कानिटकर, भिष्गवर्य पुरस्काराचे पुरस्कर्ते दिवंगत यादव पोंक्षे, वैद्य विजयकुमार पोंक्षे आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या डाॅक्टरांना हे पुरस्कार मागील अनेक वर्षापासून ब्राह्मण सभेतर्फे दिले जातात.
