डोंबिवली- डोंबिवली पूर्व येथील बाजीप्रभू चौकात दामले इमारतीत भिवाजी पावभाजी नावाने व्यवसाय करणारे जुने व्यावसायिक योगेश दामले यांचे येथे निधन झाले. ते ४९ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित बहिण असा परिवार आहे.
योगेश दामले साथ आजाराने आजारी होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. दामले प्रसिध्द शेफ होते. अनेक वर्ष त्यांनी मुंबईतील तारांकित हाॅटेलमध्ये नोकरी केली. त्यानंतर त्यांनी डोंबिवलीत बाजीप्रभू चौकात दामले इमारतीत स्वत:चा भिवाजी पावभाजी नावाने व्यवसाय सुरू केला. या नाममुद्रेचा दर्जा कायम ठेवत ते अनेक वर्ष हा व्यवसाय करत होते.
हेही वाचा >>>डोंबिवलीत धोकादायक इमारत कोसळली, पालिकेने आधीच दिली होती नोटीस
दामले यांचे वैदयकीय अहवाल ठाणे जिल्हा आरोग्य समितीकडे पालिकेच्या वैद्कीय विभागाकडून पाठविण्यात आले आहेत. दामले इमारत परिसरात साथ आजाराचे संशयास्पद रुग्ण आढल्याने पालिकेने या भागात जंतुनाशक फवारणी, घरोघऱचे सर्व्हेक्षण सुरू केले आहे. बाजीप्रभू चौक, चिमणी गल्ली भागात बाजार आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळेत नाशिवंत भाजीपाला, फुले टाकली जातात. या भागात नियमित जंतुनाशक फवारणी करण्याची मागणी या भागातील रहिवाशांकडून केली जात आहे.