डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील चिंचोडीचापाडा येथे सोमवारी दुपारी एक ४२ वर्षाचा इसम हातात सुरा घेऊन परिसरातील नागरिकांना शिवीगाळ करत धमकावत होता. विष्णुनगर पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलिसांना ही माहिती मिळताच गस्तीवरील पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित इसमाला ताब्यात घेतले.

अमित लक्ष्मण वझे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. ते चिंचोडीचापाडा भागात राहतात. अमित वझे यांच्या ताब्यातून पोलिसांनी १४ इंच लांबीचा सुरा ताब्यात घेतला आहे. शस्त्र अधिनियम कायद्याने अमित वझे यांच्यावर विष्णुनगर पोलीस ठाण्यात हवालदार शकील जमादार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

brothers beaten up, Dombivli Kachore,
डोंबिवली कचोरे येथे पेटलेला सुतळी बॉम्ब अंगावर फेकण्याच्या वादातून दोन भावांना मारहाण
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Kalyan Dombivli vehicles coming in and out of city are being checked thoroughly
कल्याण-डोंबिवलीत निवडणूक भरारी पथकांकडून वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र
resident was brutally beaten up after being asked to remove firecracker stalls from the footpath Dombivli news
डोंबिवलीत पदपथावरील फटाके स्टाॅल काढण्यास सांगितल्याच्या रागातून रहिवाशाला बेदम मारहाण; डोंबिवली पश्चिम ह प्रभागातील प्रकार
thane police
डोंबिवलीतील दोन जण पिस्तुलसह कल्याणमध्ये अटक
Dombivli Raj Thackeray meeting, Raj Thackeray,
डोंबिवलीत राज ठाकरे यांच्या सभेच्या दिवशी बेशिस्तीने वाहने चालविणाऱ्या १९ वाहनचालकांवर गुन्हे
cylinders used by vegetable vendors in dombivli
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील पदपथावर भजी विक्रेत्याकडून सिलिंडरचा वापर
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?

हेही वाचा…कल्याण-डोंबिवलीत निवडणूक भरारी, पथकांकडून वाहन तपासणी मोहीम अधिक तीव्र

u

पोलिसांंनी सांगितले, सोमवारी दुपारी विष्णुनगर पोलिसांना माहिती मिळाली की डोंबिवली पश्चिमेतील सुभाष रस्त्यावरील वझे खाणावळ भागातील हैंदऱ्या संकुल भागात एक इसम हातात सुरा घेऊन लोकांंना शिवीगाळ करत धमकावत आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी तातडीने ही माहिती गस्तीवरील हवालदार शकील जमादार यांना दिली. साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत मोरे, हवालदार जमादार, भोसले, मोरे त्यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन अमित वझे यांना शांत करून शिताफिने त्यांच्या ताब्यातील सुरा काढून घेतला. सुऱ्याला ९.५ इंच लांबीचे पाते आहे. १४ इंच लांबीचा सुरा आहे. हवालदार जमादार यांनी पंचांच्या समक्ष घटनेचा पंचनामा केला. सुरा जप्त केला. अमित यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला.

Story img Loader