scorecardresearch

डोंबिवली : चॉकलेटचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

आरोपीने घरात कोणी नसताना चॉकलेटचं आमिष दाखवत ९ वर्षीय मुलीला घरात बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याची प्रयत्न केला.

Criminal Arrested
पोलिसांनी चार तासात केली आरोपीला अटक

डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग घडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.आरोपीने घरात कोणी नसताना चॉकलेटचं आमिष दाखवत ९ वर्षीय मुलीला घरात बोलवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याची प्रयत्न केल्याची घटना समोर आल्यानंतर परिसरामध्ये एकच खळबळ उडाली. यासंबंधी विष्णुनगर पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अवघ्या चार तासात गजाआड केले आहे.

घडलेल्या घटनेसंदर्भात विष्णुनगर पोलीस स्थानकामधील विरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर तिच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या व्यक्तीने चॉकलेटचे आमिष दाखवत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भातील तक्रार विष्णुनगर पोलीस स्थानकामध्ये दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी गणेश वडेन यांच्या पथकांने खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्याआधारे आरोपीला चार तासात मोठा गाव खाडी येथून अटक केली.

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता १२ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती भालेराव यांनी दिलीय.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-11-2021 at 13:16 IST

संबंधित बातम्या