डोंबिवली पूर्व भागाचा वीज पुरवठा दोन दिवस बंद; महावितरणकडून देखभाल दुरुस्तीची कामे

देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार आहे

power outage

महावितरण कंपनीच्या वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित पावसाळापूर्व देखभाल-दुरुस्तीसाठी डोंबिवली पूर्वेतील रामनगर, टिळकनगर, केळकर रस्ता परिसरातील काही भागांचा वीजपुरवठा सोमवारी, तर आयरे गाव, म्हात्रेनगर परिसराचा वीज पुरवठा मंगळवारी काही तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. संबंधित भागातील वीज ग्राहकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.

डोंबिवलीच्या इनकमर एक फिडरवरील टिळकनगर, रामनगर, गणेश मंदीर, केळकर रोड, टिळकनगर संचयकावरील (फिडर) बालभवन, चिपळूणकर रस्ता, मानपाडा रस्ता, चित्तरंजन दास रोड, राजेंद्र प्रसाद रस्ता, टाटा लाईन या भागात सोमवारी (२३ मे) सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत, तर केळकर रस्ता संचयकावरील केळकर रस्ता, उर्सेकरवाडी, पूजा मधूबन, मानपाडा रस्ता, पूजा सिनेमागृह, शिवसेना शाखा, पालिका विभागीय कार्यालय आदी भागाचा सोमवारी (२३ मे) सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. रामनगर संचयकावरील रामनगर पोलिस ठाणे, केळकर रस्ता, राजाजी रस्ता, क्रांती नगर, मद्रासी मंदिर, म्हात्रे नगर, नवीन आयरे रस्ता, आयरे गाव या भागात मंगळवारी (२४ मे) सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

देखभाल-दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण झाल्यास संबंधित भागातील वीजपुरवठा लवकर सुरू करण्यात येणार आहे. महावितरणच्या स्वंयचलित प्रणालीमार्फत संबंधित भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर ‘एसएमएस’द्वारे वीज बंदबाबत पूर्वकल्पना देण्यात आल्या आहेत, याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dombivli east power outage for two days abn

Next Story
पुन्हा मृताच्या नावे लाटला मोबदला, कुशिवली धरणाच्या भुसंपादनात पुन्हा एकदा घोटाळा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी