डोंबिवली पूर्वेतील एका वित्तीय कंपनीत काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा मोबाईल कार्यालयात कामासाठी आलेल्या अनोळखी व्यक्तीने चोरून नेल्याची घटना गुरुवारी घडली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेतील जिओजित फायनान्स लिमिटेड मध्ये काम करणाऱ्या सविता माहे (४४) या आपल्या कार्यालयामध्ये काम करत होत्या. काही कामानिमित्त त्या बाहेर गेल्या. यावेळी सविता माहे यांनी त्यांचा महागडा मोबाईल कामाच्या टेबलवर ठेवून दिला होता. या दरम्यान कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने कार्यालयात आलेल्या एक अनोळखी व्यक्तीने माहे यांचा मोबाईल शिताफीने चोरी करत तिथून पळ काढला.

Mumbai, expensive mobile phones
मुंबई : ऑनलाईन फसवणूक करून महागड्या मोबाईलची खरेदी
Five cases filed against extortionist Vaibhav Deore three crore extortion from BJP office-bearer
खंडणीखोर वैभव देवरेविरुध्द पाच गुन्हे दाखल, भाजप पदाधिकाऱ्याकडून तीन कोटी खंडणी
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते
Two Drunk Policemen, Vandalize Hotel, Assault Owner, hudkeshwar police station, crime, marathi news,
मद्यधुंद पोलिसांची भोजनालयात तोडफोड, चित्रफीत प्रसारित झाल्याने खळबळ

थोड्यावेळेने सविता माहे या पुन्हा त्यांच्या टेबल जवळ आल्यावर त्यांना मोबाईल जागेवर नसल्याचे दिसले. मोबाईलची चोरी झाल्याचे लक्षात लक्षात येताच माहे यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यालाठी तात्काळ रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात चोरीची संपूर्ण घटना कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस अनोळखी चोरट्याचा शोध घेत आहेत.