डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसीतील शेलारनाका भारतनगर येथील मंडप साहित्याच्या गोदामाला एका अनोळखी इसमाने शनिवारी रात्री आग लावली. आगीत ६० हजाराहून अधिक किमतीचे मंडप सजावट साहित्य जळून खाक झाले. मंडप गोदामाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये अमोल वानखेडे नावाचा इसम शनिवारी रात्री एक वाजता भंगार साहित्य हातात घेऊन मंडप साहित्याला आग लावत आहे, असे पोलिसांना दिसून आले आहे. पोलीस फरार अमोलचा शोध घेत आहेत. या भूखंडांवर भूमाफियांचा बेकायदा इमारत बांधणीसाठी डोळा असावा, त्यांनी हे कृत्य केले आहे का. गर्दुल्ल्यांनी ही आग लावली आहे का, अशा अनेक बाजुने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले, दावडी गावचे रहिवासी गजानन शिंदे यांचा साई मंडप सजावट आणि साहित्य पुरवठ्याचा व्यवसाय आहे. त्यांचे मंडप साहित्याचे गोदाम डोंबिवली एमआयडीसीतील शेलारनाका येथील भारतनगर येथे आहे. मागील १० वर्षापासून ते या भागात आपले साहित्य ठेवतात. साहित्याच्या सुरक्षेसाठी त्यांनी मंडप साहित्याच्या चारही बाजुने पत्रे लावले आहेत. सामानावर देखरेख ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. रात्रीच्या वेळी घरा जाताना मंडप मालक गजानन शिंदे साहित्याची पाहणी करुन मगच घरी जातात. शुक्रवारी रात्री नेहमीप्रमाणे पाहणी करुन गजानन घरी गेले.

baramati couple found dead marathi news
बारामतीत सदनिकेत दाम्पत्य मृतावस्थेत, दाम्पत्याच्या शरीरावर तीक्ष्ण शस्त्राचे वार
pune kothrud area fire broke out godown pandal material
कोथरुडमध्ये मंडप साहित्याच्या गोदामाला आग
winners of patra chawl
पत्राचाळीतील ३०६ विजेत्यांची घरांची प्रतीक्षा संपेना, भोगवटा प्रमाणपत्र न मिळाल्याने ताबा प्रक्रियेस विलंब
buldhana, Daughter in law, Lead Social Revolution, Perform Last Rites, Father in law, Gunj village, Sindkhed Raja, marathi news, maharashtra,
बुलढाणा: चौघी सुनांनी केले सासऱ्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, सामाजिक क्रांतीतून स्त्री-पुरुष समानतेचे उदाहरण

हेही वाचा >>> ठाण्यात ६५९ मद्यपी वाहन चालक आणि सहप्रवाशांवर कारवाई

शनिवारी रात्री एक वाजता मंडप साहित्य परिसरात राहणारे ओमकार करकरे यांनी गजानन शिंदे यांना संपर्क करुन मंडप साहित्याला आग लागली आहे असे कळविले. गजानन, त्यांचा भाऊ चेतन आणि त्यांचे मित्र तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. गोदामात कापडी पडदे, प्लास्टिक खुर्च्या, विद्युत रोषणाई साहित्य, राजा राणी खुर्च्या, टेबल, पंखे, कारपेट, हॅलोजन साहित्य होते. जळाऊ साहित्य असल्याने आगीचा भडका उडाला. आग आटोक्यात येणे शक्य नव्हते. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत निम्म्याहून अधिक साहित्य जळून खाक झाले होते. जवानांनी तात्काळ उर्वरित आग विझवली. आगीत ६० हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले. मंडप साहित्य गोदामाच्या लगतच्या सीसीटीव्ही मध्ये अमोल वानखेडे नावाचा इसम ही आग लावत असल्याचे दिसून आले आहे. गजानन शिंदे यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल केला आहे. एमआयडीसी भागात गर्दुल्ले, भिकारी रात्रीच्या वेळेत गोदाम साहित्य परिसरात निवासासाठी येतात.