डोंबिवली – डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सलग सहाव्या वर्षी निवृत्तीवेतन धारकांसाठी विनामूल्य ऑनलाइन जीवन प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन रविवार, १ नोव्हेंबर ते बुधवार, ४ नोव्हेंबर या कालावधीत दररोज संध्याकाळी ६ ते रात्री ८ या वेळेत टिळकनगर शाळेजवळील विराट सोसायटीतील मंडळाच्या कार्यालयात आयोजित करण्यात आले आहे.

रविवारी, १ नोव्हेंबर २०२६ रोजी ईशा नेत्रालय ह्यांच्या संयुक्त विद्यमाने मंडळाने सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत ईशा नेत्रालय, पहिला मजला, दुर्वे एरिना फतेह अली रोड, के. बी. वीरा शाळेसमोर, केडीएमसी ऑफिसच्या मागे, डोंबिवली ( पूर्व ) येथे अन्य एका शिबिराचे आयोजन केले आहे. यावेळी निवृत्तीवेतन धारकांसाठी विनामूल्य नेत्र तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.

याठिकाणी लिफ्टची सुविधा उपलब्ध असून निवृत्ती वेतनधारकांनी ऑनलाईन जीवन प्रमाणपत्रासाठी येताना सोबत आधार कार्ड, पेन्शन बुक, पेन्शन अकाऊंट पासबुक आणि आधार कार्डाशी नोंदणीकृत जोडणी असलेला मोबाईल सोबत घेऊन येण्याचे आवाहन मंडळाचे कार्यवाह संजय शेंबेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रकल्प प्रमुख केदार पाध्ये : ९७६९१२१०७७, सोनाली गुजराथी: ९८१९९२१२२० आणि प्रतीक वेलणकर ९८३३२१६६४० यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.