डोंबिवली – वारंवार नोटिसा पाठवूनही अनेक वर्षाच्या थकीत मालमत्ता कराची ४० लाखाहून अधिक रकमेची थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार थकबाकीदारांच्या गा‌ळ्यांना टाळे लावण्याची कारवाई कल्याण डोंबिवली पालिकेच्या ग प्रभागाच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी केली. या दुकानांच्या मालमत्ता कराची थकित रक्कम मालमत्ताधारकांनी विहित वेळेत भरणा केली नाही तर गाळ्यांवर जप्तीची कारवाई करून त्यांचा लिलाव करण्यात येईल, असे ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी सांगितले.

डोंबिवलीत ग प्रभाग हद्दीतील दत्तनगर भागातातील दोन गाळेधारकांकडे मालमत्ता कराची एकूण ३४ लाख ३९ हजार ७६७ रुपयांची थकबाकी आहे. उर्सेकरवाडीतील भागातील दोन गाळे धारकांकडे पाच लाख ६६ हजार रुपयांची थकबाकी आहे. ही कराची थकित रक्कम भरणा करण्यासाठी मालमत्ता कर विभागाने मालमत्ता करधारकांना वेळोवेळी नोटिसा पाठविल्या. त्यांच्याकडून विहित वेळेत कर भरणा करण्याची प्रक्रिया करण्यात आली नाही. चार गाळ्यांचे मालक मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करत असल्याने मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या आदेशावरून ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत, अधीक्षक ज्ञानेश्वर कंखरे, लिपिक गोविंद पोटे, प्रभाकर कदम, भीमराव बडेकर यांच्या उपस्थितीत चार गाळ्यांना टाळे लावण्याची कारवाई केली.

maharashtra election commissioner news in marathi
राज्य निवडणूक आयुक्तपदाचा आज निर्णय; नितीन करीर, राजीव जलोटा, राजगोपाल देवरा स्पर्धेत
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
sebi taken various steps to encourage the dematerialization of shares print
‘डिमॅट’ अनिवार्य करण्याचा विचार : सेबी
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Dombivli illegal hoardings loksatta news
डोंबिवलीत बेकायदा फलक लावणाऱ्या आस्थापनांवर फौजदारी गुन्हे, पाच हजार फलकांवर कारवाई
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…

हेही वाचा – ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस

हेही वाचा – लोकलमध्ये डोंबिवलीतील प्रवाशांना, मद्यधुंद खासगी सुरक्षकाची दमदाटी

मालमत्ता कर वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मालमत्ता कर थकबाकीदारांना पहिले कर भरण्यासाठी नोटिसा पाठविल्या जातात. या नोटिसांप्रमाणे थकबाकीदारांनी कर भरणा केला नाहीतर तर त्यांच्या मालमत्तांना टाळे लावण्यात येते. कर थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी लवकरात लवकर कर भरणा करावा. – संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.

Story img Loader