डोंबिवली: पुणे येथे जाण्यासाठी निघालेल्या एका शिक्षिकेला ऑनलाईन गुगल माध्यमातून आपण ट्रॅव्हल्स एजंट असल्याचे दाखवून शिक्षिकेच्या बँक खात्यामधून एक लाख ७५ हजार रुपये बनावट मध्यस्थाने परस्पर स्वताच्या बँक खात्यामध्ये वळते करुन घेतले आहेत. मानपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोनम रघुवंशी या शिक्षिका आहेत. त्या पलावा वसाहतीमध्ये राहतात. गेल्या गुरुवारी सोनम यांना पुणे येथे जायाचे होते. यासाठी त्यांनी ऑनलाईन माध्यमातून गुगलवर टॅक्सी सेवे संदर्भात चौकशी केली. त्यांना अमनदीप शर्मा नावाच्या इसमाने तात्काळ मोबाईलवरुन संपर्क केला. आपण ट्रॅव्हल्स एजंट आहोत. डोंबिवली ते पुणे टॅक्सी आपणास देऊ शकतो अशी ट्रॅव्हल्स एजंटने माहिती दिली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेऊन सोनम रघुवंशी यांनी भाडेदरा संदर्भात विचारणा केली. हे बोलणे सुरू असताना बनावट ट्रॅव्हल्स एजंट अमनदीप याने सोनम यांच्या क्रेडिट कार्ड व्यवहारातून एक लाख ७५ हजार रुपये परस्पर वळते करुन स्वताच्या बँक खात्यात वर्ग केले.

हेही वाचा: आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा; आमदारकीचा राजीनामा देण्याचा इशारा; नेत्यांकडून मनधरणी

गेल्या गुरुवारी दुपारी १२ ते एक वाजताच्या दरम्यान हा प्रकार घडला. आपण कोणताही व्यवहार केला नसताना अचानक आपल्या क्रेडिट कार्ड मधून पैसे वळते झाल्याचे लघुसंदेश शिक्षिका सोनम यांना मिळताच, त्यांनी आपणास संपर्क करणारा अमनदीप हा भुरटा चोर असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आपली ट्रॅव्हल्स एजंटने फसवणूक केली आहे, अशी तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli teacher cheated of rs two lakh by ftrake avel agent fraud news tmb 01
First published on: 15-11-2022 at 11:05 IST