डोंबिवलीचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद

डोंबिवली शहराला पाणी करणाऱ्या कल्याण जवळील कचोरे येथील नेतीवली टेकडीवरील १५० दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण केंद्रात आवश्यक तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे.

water
( संग्रहित छायचित्र )

डोंबिवली शहराला पाणी करणाऱ्या कल्याण जवळील कचोरे येथील नेतीवली टेकडीवरील १५० दशलक्ष लीटर जलशुध्दीकरण केंद्रात आवश्यक तातडीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी डोंबिवली पूर्व, पश्चिम शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कल्याण डोंबिवली पालिका पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण वाघमारे यांनी दिली.

मंग‌ळवारी दिवसभर पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रहिवाशांनी एक दिवस पुरेल इतका वाढीव पाणी साठा करून ठेवावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले.

यापूर्वी डोंबिवली शहराला बारावे येथील जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी पुरवठा केला जात होता. डोंबिवली शहराची वाढती वस्ती, नागरीकरणाचा विचार करून आठ वर्षापूर्वी नेतीवली येथील टेकडीवर पालिकेने डोंबिवलीसाठी स्वतंत्र जलशुध्दीकरण केंद्र उभारले. या केंद्रातून डोंबिवली शहराला पाणी पुरवठा केला जातो. या केंद्रात तातडीने दुरुस्तीचे काम निघाल्याने मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dombivli water supply closed on tuesday amy

Next Story
कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयातील छत कोसळले
फोटो गॅलरी