कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नेतिवली येथील जलशुध्दीकरण केंद्रात विद्युत आणि यांंत्रिकी उपकरणांची दुरुस्ती आणि डोंंबिवलीतील फ, ग आणि ह प्रभागातील वितरण वाहिन्यांवरील गळती थांबविणे आणि व्हाॅल्व्ह दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवली शहराचा पाणी पुरवठा मंगळवारी (ता. २६) सकाळी ११ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

डोबिवली पूर्व आणि पश्चिम भागाचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद राहणार असल्याने दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी एक दिवस पुरेल इतका पाणी साठा करून ठेवण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Water reservation process stalled in many districts due to lack of Guardian Minister is now being cleared through initiative of Water Resources Minister
कालवा सल्लागार समिती बैठकांची सूत्रे जलसंपदा मंत्र्यांकडे, पालकमंत्र्यांअभावी पुढाकार
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
Sudhir Mungantiwar , Chandrapur Power Station,
“…तर चंद्रपूर वीज केंद्रातील दोन संच बंद करू,” मुनगंटीवार यांचा इशारा
Ghodbunder residents questions to thane municipal officials regarding water tanker and water issues
आम्हाला देण्यासाठी पाणी नाही मग, टँकरचालकांना कसे मिळते; घोडबंदरवासियांनी विचारला पालिका अधिकाऱ्यांना सवाल
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
vasai municipal illegal constructions
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार, अनधिकृत बांधकामांना पाणी न देण्याचा पालिकेचा निर्णय

हेही वाचा : डोंबिवली जवळील अप्पर कोपर रेल्वेस्थानकातील प्रवाशांचा रेल्वे मार्गातून प्रवास

डोंबिवली पूर्वेतील फ, ग आणि पश्चिमेतील ह प्रभाग हद्दीतील अनेक ठिकाणच्या पाणी पुरवठा करणाऱ्या वितरण वाहिन्यांवर गळती सुरू आहे. हे गळतीचे पाणी रस्त्यावरून वाहते. पालिकेकडून सकाळ, दुपार, संध्याकाळी पाणी पुरवठा सुरू झाला की पाणी वितरण वाहिन्यांमधून गळती असलेल्या भागातून अधिकचे पाणी वाहून जाते. काही ठिकाणी व्हाॅल्व्हमध्ये बिघाड असल्याने त्या ठिकाणाहून पाण्याचे कारंजे सतत उडत असतात. यामुळे शेकडो लीटर पाणी वाया जाते. रस्त्यांवरून पाणी वाहून जात असल्याने अनेक भागात नागरिकांना रस्त्यावर होणाऱ्या चिखलामुळे चालणे अवघड होऊन जाते. दुचाकी या भागात घसरून पडतात. पाणी गळती विषयी नागरिकांच्या पालिकेतील तक्रारी वाढल्या होत्या.

हेही वाचा : MNS in Thane : ठाणे जिल्ह्यात मनसेला उतरती कळा

गेल्या दोन महिन्यापासून विधानसभा निवडणूक कामात कल्याण डोंबिवली पालिकेचा कर्मचारी वर्ग व्यस्त होता. त्यामुळे ही पाणी गळतीची कामे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना तातडीने हाती घेणे शक्य होत नव्हते. आता निवडणुका संपल्याने पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने ही दुरुस्तीची कामे हाती घेतली आहेत.

Story img Loader