डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेतील भगवान काठेनगरमध्ये राहत असलेल्या पत्नीने आपल्या पतीचा मित्रांच्या मदतीन छळ करून, त्याला मानसिक, शारीरिकदृष्ट्या त्रास देऊन त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले असल्याचे विष्णुनगर पोलिसांनी केलेल्या तपासात उघडकीला आले आहे. गेल्या आठ महिन्यापूर्वी पतीने आत्महत्या केल्यानंतर दाखल गुन्ह्याप्रमाणे पोलिसांनी तपास सुरू केला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधाकर यशवंत यादव (४२, रा. लिलाबाई म्हात्रे चाळ, भगवान काठे नगर, डोंबिवली) असे मयत पतीचे नाव आहे. संजना सुधाकर यादव (३१) आरोपी पत्नीचे नाव आहे. संजनाने महम्मद शेख, महेश पाटील आणि एक अनोळखी इसम यांच्या सहकार्याने आपल्या पत्नीचा मानसिक छळ केला. त्याला विविध प्रकारे त्रास देऊन त्याला जीवन जगणे आरोपींनी हैराण केले. पत्नीसह तिच्या मित्रांकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून आठ महिन्यापूर्वी सुधाकर यादव यांनी राहत्या घरात एकटा असताना घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा…घोडबंदर घाटात तेल सांडले, ठाणेकर कोंडीत अडकले

सुधाकरचा बदलापूर येथे राहणारा भाऊ प्रभाकर यशवंत यादव यांनी भावाच्या आत्महत्येप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात डिसेंबर २०२३ मध्ये तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने विष्णुनगर पोलिसांनी सखोल चौकशी केली. या चौकशीत सुधाकर याला त्याची पत्नी संजना आणि आरोपी मित्र हे खूप त्रास देत असल्याचे तपासातून पुढे आले. या त्रासाला कंटाळून सुधाकर यादवने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या तपासानंतर विष्णुनगर पोलिसांनी पत्नी संजनासह तिच्या आरोपी मित्रांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक जी. बी. देवरे यांनी याप्रकरणाचा तपास केला.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dombivli wife and her friend forced to husband s suicide revealed in vishnunagar police investigation psg
Show comments