scorecardresearch

मुंबई ते गोवा…वॅगनआरने प्रवास करत जनशताब्दी एक्सप्रेसला टाकले मागे; एक तास आधीच गाठले मडगाव

तेजस हंजणकर या तरुणाने जनशताब्दी एक्सप्रेसला मागे टाकत एक तास आधीच आपले निश्चित ठिकाण गाठले

Tejas Hanjankar
(फोटो – PTI)

मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था सर्वश्रुत असल्याने या रस्त्याने प्रवास करणे अनेकांना नकोसे वाटते. मुंबई ते गोवा व गोवा ते मुंबई हा परतीचा प्रवास १२०० किलोमीटर अंतराचा आहे. अशा परिस्थितीत कोकण रेल्वे मार्गावर जलद धावणाऱ्या मुंबई सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेसशी दिवा गावातील एका तरुणाने वॅगनआर गाडीने स्पर्धा केली. जनशताब्दी एक्सप्रेसला परतीच्या प्रवासासाठी १८ तास लागतात. मात्र वॅगनआर चालक तेजस हंजणकर या तरुणाने जनशताब्दी एक्सप्रेसला मागे टाकत एक तास आधीच आपले निश्चित ठिकाण गाठले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोचरा येथील मूळचा रहिवासी असलेला तेजस सध्या दिवा गावात राहतो. तेजस हंजनकरने जनशताब्दी एक्स्प्रेसला मागे टाकण्याचा निश्चय केला होता. जुन्या मुंबई गोवा मुंबई महामार्गाने तो मडगाव येथे जनशताब्दी एक्सप्रेस येण्याआधीच पोहचला. त्यामुळे आता या विक्रमाची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड, लिम्का बुक आणि इंडिया बुक रेकॉर्ड बुक मध्ये होणार आहे.

जनशताब्दी एक्सप्रेस मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी सुटते व मडगाव – गोवा येथे २ वाजून २० मिनिटांनी पोहोचते. ही गाडी पुन्हा मुंबईकडे  परतीच्या प्रवासाला २ वाजून ४० मिनिटांनी निघते आणि रात्री ११ वाजून २० मिनिटांला मुंबई सी.एस.एम.टी पोहोचते. १ मार्च रोजी मुंबई येथून सकाळी ५ वाजून १० मिनिटांनी निघालेला तेजस मडगाव येथे जनशताब्दी एक्सप्रेसच्या १ तास २० मिनिटे आधीच पोहोचला होता. तेजसने आपल्या नावावर नवीन विक्रम प्रस्थापित केला. कोकणातील अतिजलद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनशताब्दी एक्सप्रेसला मागे टाकण्याचे आव्हान त्याने पार पाडले. तेजसने १६ तास ३१ मिनिटे गाडी चालवून हा विक्रम केला. या संपूर्ण प्रवासात त्याने फक्त ३४ मिनिटे थांबा घेतला. जो या रेकॉर्ड टाईम मध्ये समाविष्ट नाही. तेजस चालवत असलेल्या गाडीचा सर्वात टॉप स्पीड १५७ प्रती तास किमी होता .

तेजसला या विक्रमासाठी अनेक लोकांनी सहकार्य केले. यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याला विशेष सहकार्य केले.  वॅगनआर गाडीची देखरेख व दुरुस्ती करणारे ऑटोमॅटिव्ह मॅन्युफॅक्चर्सचे सल्लागार, त्याचे मित्र अक्षय गायकवाड, अंकुश जनकर, चिन्मय जाधव, तन्मय जाधव, जानवी गुरव, अमित विसपुते यांच्यासह उमेश भगत, उपमहापौर रमाकांत मढवी यांचे देखील सहकार्य लाभले.

या यशाचे श्रेय तेजसने आई प्रतिभा आणि वडील चंद्रकांत हंजनकर यांना दिले. येत्या काळात काश्मीर ते कन्यापुरी हा प्रवास ५० तासात पूर्ण करण्याचा त्याने निश्चय केला आहे.

मात्र

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dombivli youth boarded the janshatabdi express while traveling in a wagonr on the mumbai goa highway abn

ताज्या बातम्या