डोंबिवलीतील एक तरुण ऋषभ भानुशाली (२७) हा मुलुंड येथे शनिवारी दांडिया खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.डोंबिवलीतील जुन्या डॉन बॉस्को शाळेमागील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये ऋषभ आई-वडिलांबरोबर रहात होता. व्यवस्थापन अभ्यासक्रमात पदव्युत्तर असलेला ऋषभ अलीकडेच बोरीवलीतील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करत होता.

हेही वाचा >>> ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक

घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.मुलुंडचे भाजप खा. मनोज कोटक यांच्यातर्फे कालिदास नाट्यगृह येथे आयोजित प्रेरणा रास दांडिया खेळण्यासाठी शनिवारी ऋषभ कुटुंबीयांसोबत गेला होता. दांडिया खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी आम्लपित्त झाल्याचे समजून त्याला थंड पेय पाजले. त्रास जास्तच जाणवल्याने तत्काळ त्याला रुग्णवाहिकेतून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सोमवारी ऋषभच्या डोंबिवलीती घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.