डोंबिवलीतील तरुणाचा मुुलुंडमध्ये दांडिया खेळताना मृत्यू | Dombivli youth dies while playing Dandiya in Mulund amy 95 | Loksatta

डोंबिवलीतील तरुणाचा मुुलुंडमध्ये दांडिया खेळताना मृत्यू

डोंबिवलीतील एक तरुण ऋषभ भानुशाली (२७) हा मुलुंड येथे शनिवारी दांडिया खेळण्यासाठी गेला होता.

डोंबिवलीतील तरुणाचा मुुलुंडमध्ये दांडिया खेळताना मृत्यू
( प्रातिनिधिक छायाचित्र )

डोंबिवलीतील एक तरुण ऋषभ भानुशाली (२७) हा मुलुंड येथे शनिवारी दांडिया खेळण्यासाठी गेला होता. खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागले. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याचा हदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला.डोंबिवलीतील जुन्या डॉन बॉस्को शाळेमागील त्रिमूर्ती अपार्टमेंटमध्ये ऋषभ आई-वडिलांबरोबर रहात होता. व्यवस्थापन अभ्यासक्रमात पदव्युत्तर असलेला ऋषभ अलीकडेच बोरीवलीतील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर काम करत होता.

हेही वाचा >>> ठाणे : बोगस काॅलसेंटर चालवणाऱ्यांना अटक ; काॅलसेंटरच्या माध्यमातून परदेशी नागरिकांची फसवणुक

घरातील एकुलता एक मुलगा गमावल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.मुलुंडचे भाजप खा. मनोज कोटक यांच्यातर्फे कालिदास नाट्यगृह येथे आयोजित प्रेरणा रास दांडिया खेळण्यासाठी शनिवारी ऋषभ कुटुंबीयांसोबत गेला होता. दांडिया खेळत असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागल्याने कुटुंबीयांनी आम्लपित्त झाल्याचे समजून त्याला थंड पेय पाजले. त्रास जास्तच जाणवल्याने तत्काळ त्याला रुग्णवाहिकेतून जवळच्या खासगी रुग्णालयात नेले. तेथे दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. भाजप नेते किरिट सोमय्या यांनी सोमवारी ऋषभच्या डोंबिवलीती घरी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
डोंबिवली : भोपर जळीत कांडातील दोन्ही बहिणींचा मृत्यू

संबंधित बातम्या

लोकशाही दुबळी करण्याचे भाजपचे प्रयत्न – शरद पवार
ठाण्यात आज रिक्षा-टॅक्सी बंद
तरुणीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

व्हिडिओ

ताज्या बातम्या
चीनमध्ये जनआंदोलनानंतर करोना निर्बंध शिथिल 
तृतीयपंथीयांना नोकरीची संधी डावलता येणार नाही; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
नेत्यांकडे स्वत:ची मते, व्यासंग असावा – देवेंद्र फडणवीस
गोवर रुग्णांच्या नमुन्यांच्या तपासणीसाठी हाफकीन तयार
Maharashtra Karnataka border: एसटीच्या ३८२ फेऱ्या अंशत: रद्द