लोकसत्ता प्रतिनिधी
बदलापूरः प्रत्येक पात्र बेघर कातकरी कुटुंबाला शासनाकडून घर दिले जाणार असून भूमीहिन कातकरी बांधवांना घर बांधणीसाठी जागाही दिली जाणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. शहापूर येथे आदिवासी आदिम कातकरी संघटनेच्या वतीने आयोजित कातकरी समाज प्रबोधन मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
शहापूर येथील चिरनेर हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या ९३ व्या पुण्यतिथीनिमित्त आदिम कातकरी संघटनेच्या वतीने आणि मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने कातकरी समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ठाणे,
हेही वाचा… कलानींना वळविण्याचे पवार गटाचे प्रयत्न
‘कातकरी समाजातील तरूणांनी शिक्षण आणि स्वयंरोजगाराचा मार्ग स्विकारून स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्यासाठी शासन पूर्णतः मदत करेल असे आश्वासन यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी दिले. शिधापत्रिका, आधार कार्ड यांसारखी शासकीय ओळखपत्रे नसल्याने आदिवासी बांधवांना योजनांचा फायदा घेता येत नाही. मात्र संघटनांनी त्यासाठी प्रयत्न करावेत. त्यासाठी लागणारा निधी आदिवासी विभाग देईल. प्रत्येक आदिवासी पाड्यांपर्यंत बस जाईल यासाठी रस्त्यांची योजना शासनाने राबवण्यास सुरूवात केली आहे. लवकरच ही कामे सुद्धा पूर्ण होतील, असे त्यांनी सांगितले. विटभट्टीवर मजूर म्हणून काम करण्यापेक्षा तिथे मालक व्हा, शासन त्यासाठी मदतही करेल, असेही ते म्हणाले. यावेळी आमदार किसन कथोरे यांनी कातकरी बोली भाषेत संवाद साधत मंत्र्यांपुढे कातकरींच्या समस्या मांडल्या.
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr vijaykumar gavit informed that eligible homeless katkari family will be given a house and landless katkari families will be given place to build house by government dvr