डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार नाटकाच्या प्रयोगांची तिकिटे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या इमारतीमधील एका दालनातून विकली जात होती. ही इमारत धोकादायक असल्याने आणि पावसामुळे इमारतीत जलधार लागल्या आहेत. नाटक तिकीट विक्री दालनही पावसाच्या पाण्याने गळत असल्याने या दालनातील नाटक तिकीट विक्री बुधवार पासून बंद करण्यात आली आहे.

या तिकीट विक्रीतील कर्मचारी बुधवार पासून डोंबिवली रेल्वे स्थानका जवळ पालिकेकडून पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने सावित्रीबाई नाट्यगृहात तिकीट विक्रीसाठी बसणार आहेत. नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकांची गर्दी व्हावी म्हणून नाट्य निर्माता संघाचा एक प्रतिनिधी नाट्यगृहात तिकीट विक्री करत असतो. सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली शहराच्या बाहेर आहे. नाटकाचे तिकीट खरेदीसाठी नागरिकांना ७० ते ८० रुपये खर्च करून नाट्यगृहाकडे येण्यास लागू नये. नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानका जवळ नाटक तिकीटे खरेदीची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून माजी स्थायी समिती सभापती अजित नाडकर्णी, माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या तळमजल्याला दर्शनी भागात सावित्रीबाई फुले नाट्यगृहात लागणाऱ्या नाटकाच्या तिकिटांची विक्री करण्यासाठी एक दालन देण्याचा निर्णय घेतला. त्याची तात्काळ अंमलबजावणी करून या दालनात नाट्य निर्माता संघाचा एक प्रतिनिधी नाटक तिकीट विक्रीसाठी मागील दहा वर्षापासून बसतो.

furnaces of gold and silver factories
मुंबई : सोन्या-चांदीच्या कारखान्यांची भट्टी आणि धुरांडी हटवली, महापालिकेची गिरगाव, मुंबादेवीत कारवाई
megablock
रेल्वेचा मेगाब्लॉक! पुणे – लोणावळा दरम्यान अनेक गाड्या रद्द, काही उशिराने धावणार
Kalyan Dombivli, municipal corporation, Tree Census, 7 Lakh Trees, Reveals,
कल्याण डोंबिवली पालिका हद्दीत सात लाखाहून अधिक वृक्ष, दोन हजार ६५० वारसा वृक्षांचा समावेश
Ajni Chowk
नागपूर : पाच रस्ते, मेट्रोस्थानकामुळे अजनी चौक ‘अपघातप्रवण’! नीरीच्या नियोजित जागेवर मेट्रो स्थानक न बांधल्याचा फटका

पालिकेची इमारत धोकादायक म्हणून जाहीर करण्यात आली आहे. इमारतीमधील प्रभाग कार्यालये अन्यत्र स्थलांतरित करण्यात आली आहेत. याठिकाणी केडीएमटीचे वाहक, चालक यांना बसण्यासाठी दालन आणि नाटक तिकीट विक्रीचे दालन सुरू ठेवण्यात आले होते.पाऊस सुरू झाल्यापासून नाटक तिकीट विक्रीचे दालनात पाणी ठिपकत आहे. टेबल, खुर्चीवर पाणी पडते. दालनातील कपाटात तिकिटे असतात. ती पावसाच्या पाण्याने भिजण्याची शक्यता आहे. दोन वर्षापासून चांगल्या दालनाची मागणी करत आहे. त्याला प्रतिसाद मिळत नाही, असे नाट्य निर्माता संघाचे प्रतिनिधी मोहन सुतावणे यांनी सांगितले. दालनात पावसाचे पाणी झिरपत असल्याने बुधवारपासून आपण नाट्यगृहात बसणार आहोत, असे सुतावणे यांनी सांगितले.

रेल्वे स्थानकाजवळ तिकीट विक्री दालन असल्याने नोकरदार वर्ग कामाला जाताना तिकीट खरेदी करत होता. स्थानिक रहिवासी वेळेत येऊन तिकीट खरेदी करून जात होते. आता नाटकाची तिकिटे खरेदी करण्यासाठी नागरिकांना ७० ते ८० रुपये खर्च करून सावित्रीबाई फुले नाट्यगृहात जावे लागेल. चांगल्या नाटकाच्या तिकिटांची आठ ते १० हजार रुपयांची विक्री एक दिवसात पालिका कार्यालयात दालनात होत होती. आता हे केंद्र बंद केल्याने तिकीट विक्रीवर परिणाम होईल, अशी माहिती सुतावणे यांनी दिली.

सावित्रीबाई नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लदवा यांनी सांगितले, दोन वर्षापासून नाट्य निर्माता संघाच्या प्रतिनिधीला आम्ही पी. पी. चेम्बर्स माॅल, बाजी प्रभू चौकातील केडीएमटी दालन कक्षात जागा देण्यास तयार आहोत. ते रस्त्यावरील दर्शनी जागा मागतात. तशी जागा उपलब्ध नाही. बाजी प्रभू चौकातील जागा नाट्य निर्माता संघाच्या प्रतिनिधीला उपलब्ध करून देण्यात येईल. नागरिकांची ओढाताण होणार नाही याची काळजी घेतली जाईल. गुरुवारपासून बाजी प्रभूचौकातील केडीएमटी बस स्थानका जवळील दालनात नाटक तिकीट विक्री दालन सुरू केले जाईल.

दोन वर्षापासून नाट्य निर्माण संघाच्या प्रतिनिधीला पर्यायी जागा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. ती जागा त्यांना पसंत नाही. नागरिकांची गैरसोय नको म्हणून बाजी प्रभू चौकातील जागा सुस्थितीत करून त्यांना देण्यात येत आहे.- दत्तात्रय लदवा,व्यवस्थापक सावित्रीबाई फुले नाट्यगृह ,डोंबिवली