डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहात होणार नाटकाच्या प्रयोगांची तिकिटे डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानका जवळील पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या इमारतीमधील एका दालनातून विकली जात होती. ही इमारत धोकादायक असल्याने आणि पावसामुळे इमारतीत जलधार लागल्या आहेत. नाटक तिकीट विक्री दालनही पावसाच्या पाण्याने गळत असल्याने या दालनातील नाटक तिकीट विक्री बुधवार पासून बंद करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या तिकीट विक्रीतील कर्मचारी बुधवार पासून डोंबिवली रेल्वे स्थानका जवळ पालिकेकडून पर्यायी जागा उपलब्ध न झाल्याने सावित्रीबाई नाट्यगृहात तिकीट विक्रीसाठी बसणार आहेत. नाटकाच्या प्रयोगांना प्रेक्षकांची गर्दी व्हावी म्हणून नाट्य निर्माता संघाचा एक प्रतिनिधी नाट्यगृहात तिकीट विक्री करत असतो. सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली शहराच्या बाहेर आहे. नाटकाचे तिकीट खरेदीसाठी नागरिकांना ७० ते ८० रुपये खर्च करून नाट्यगृहाकडे येण्यास लागू नये. नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानका जवळ नाटक तिकीटे खरेदीची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून माजी स्थायी समिती सभापती अजित नाडकर्णी, माजी आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या तळमजल्याला दर्शनी भागात सावित्रीबाई फुले नाट्यगृहात लागणाऱ्या नाटकाच्या तिकिटांची विक्री करण्यासाठी एक दालन देण्याचा निर्णय घेतला. त्याची तात्काळ अंमलबजावणी करून या दालनात नाट्य निर्माता संघाचा एक प्रतिनिधी नाटक तिकीट विक्रीसाठी मागील दहा वर्षापासून बसतो.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drama ticket sales window closed near dombivli railway station amy
First published on: 06-07-2022 at 17:25 IST