डोंबिवली रेल्वे स्थानकातील कल्याण आणि मधल्या भागातील, तसेच पालिका हद्दीतील स्कायवाॅकवर रात्रीच्या वेळेत मद्यपी, गर्दुल्ले येऊन बसतात. मद्यपी प्रवाशांच्या येण्या जाण्याच्या वाटेत पडलेले असतात. सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या प्रवाशांना या मद्यपींचा त्रास वाढू लागला आहे. रेल्वे सुरक्षा जवान, लोहमार्ग आणि पालिकेच्या पथक, पोलिसांनी स्थानकात, स्कायवाॅकवर येणाऱ्या मद्यपी, गर्दुल्ले, भिकारी यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

हेही वाचा >>>कल्याण: दहावीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या

tank bomb shell Hinjewadi
हिंजवडीत पुलाचे काम करताना रणगाड्याचे बॉम्बशेल सापडले
dombivli ganesh nagar marathi news
डोंबिवलीतील गणेशनगरमधील रस्ता काँक्रीटीकरणासाठी बंद, नवापाड्यात जाण्यासाठी प्रवाशांचा वळसा घेऊन प्रवास
Passengers are monitored through cameras based on AI technology in Pune railway station
सावधान! रेल्वे प्रवाशांवर ‘एआय’ कॅमेऱ्यांची नजर; संशयास्पद हालचाली टिपल्या जाताहेत
Stolen pipe connections to illegal buildings in Dombivli man arrested including plumber
डोंबिवलीत बेकायदा इमारतींना चोरीच्या नळजोडण्या, प्लंबरसह मध्यस्थ अटकेत

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानका जवळ विष्णुनगर मध्ये मासळी बाजार आहे. टाकाऊ मासळी खाण्यासाठी श्वानांचा या भागात वाढता वावर आहे. मासळी बाजारातील हे श्वान आरामासाठी डोंबिवली रेल्वे स्थानकातील स्कायवाॅकवर प्रवाशांच्या येजा करण्याच्या मार्गात बसलेले असतात. अनेक प्रवासी श्वानांना हुसकावण्याचा प्रयत्न करतात. ते जागेवरचे हटत नाहीत. या मार्गातून शाळकरी मुले येजा करतात. त्यांना वाटेत झोपलेल्या श्वानांची भीती वाटते.

हेही वाचा >>>अंबरनाथः दोन कार अपघातात एकाचा मृत्यू एका चालकाची डुलकी, तर दुसऱ्याचे नियंत्रण सुटल्याने अपघात

अनेक महिने डोंबिवली रेल्वे स्थानकातील भिकारी, मद्यपी यांचा वावर कमी झाला होता. आता हा संचार वाढू लागला आहे. रेल्वे सुरक्षा जवानांनी रात्रीच्या वेळेत भिकारी, मद्यपी यांना स्थानकात येऊ दिले नाही तर प्रवाशांना त्रास होणार नाही. पोलिसांची रात्रीची गस्त कमी पडते. त्यामुळे मद्यपी स्थानकात येऊन बसतात, अशा तक्रारी रेल्वे प्रवासी संघटनांनी केल्या आहेत. रेल्वे स्थानक व्यवस्थापकांच्या समोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेल्वे स्थानकाच्या चारही बाजुने सुरू असलेल्या हालचाली कळत असतात. त्यांना रेल्वे मार्गिकेवरील स्कायवाॅकवरील गर्दुल्ले दिसत नाहीत का, असे प्रश्न प्रवासी करतात.

काही गर्दुल्ले पालिका हद्दीतील स्कायवाॅकवर पडलेले असतात. त्यामुळे पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाच्या कामगारांनी या फिरस्त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी प्रवासी करत आहेत. पालिका आणि रेल्वे जवानांनी एकत्रितपणे दररोज रेल्वे स्थानकात येणाऱ्या फिरस्त्यांवर कारवाई केली तर डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात एकही गर्दुल्ला, भिकारी, मद्यपी दिसणार नाही, असे प्रवाशांनी सांगितले.