प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची गेल्या सहा महिन्यातील विधाने यामुळेच आम्ही शिवसेनेसोबत युती केल्याची माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिली. आम्ही एकत्र आलो असलो तरी दोन्ही पक्ष आपआपल्या भुमिकांवर ठाम राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर, जाती-पातीचे राजकारण गाडून एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले असल्याचा दावा शिवसेनेचे ठाणे प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी केला आहे.

हेही वाचा >>> डोंबिवली : एकाच घरात राहत असलेल्या नोकरदार मैत्रिणीकडून मैत्रिणीच्या पैशाची ऑनलाईन चोरी

Sharad Pawar On PM Narendra Modi
शरद पवारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका; म्हणाले, “रशियाचे पुतिन आणि मोदी…”
chhatrapati sambhajinagar, Chandrakant Khaire, Imtiaz Jaleel, Eid, lok sabha election 2024
औरंगाबादमध्ये मुस्लीमबहुल भागातही शिवसेनेचा राबता वाढला, खैरे आणि इम्तियाज जलील यांची गळाभेट
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान
Chandrapur
चंद्रपूर : जिल्हा बँकेचे अध्यक्ष रावत व आमदार धानोरकर यांच्यात बंदद्वार चर्चा, दोन्ही नेत्यांमध्ये होते राजकीय वितुष्ट

ठाणे येथील शासकीय विश्राम गृहामध्ये शुक्रवारी शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षांच्या युतीच्या पुढील वाटचालीबाबत भुमिका मांडली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे नेते मनोज आखरे हे दोन्ही नेते आगामी निवडणुकांबाबत चर्चा करून त्याबाबतचा निर्णय घेणार आहेत. तसेच दोन्ही पक्षांच्या जिल्हा आणि तालुका पातळीवर समित्या तयार करण्यात येणार असून याशिवाय, राज्यभरात शिवसंवाद मेळावे घेण्याबाबत विचार सुरु आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष सुहास राणे यांनी दिली. बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झालेले असल्यामुळे तो विषय आता आमच्यादृष्टीने संपला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> डोंबिवली : आई आजारी आहे, मोबाईल देता का? बोलून भामट्यांनी तरुणाचा मोबाईल पळविला ; ठाकुर्ली ९० फुटी रस्त्यावरील घटना

मध्यंतरीच्या काळात संभाजी ब्रिगेड संघटनेसोबत आमचे काही विषयावरून मतभेद झाले होते. पण, आता जाती-पातीचे राजकारण गाडून एकसंघ समाज निर्माण करण्यासाठी दोन्ही पक्ष एकत्र आले आहेत. आम्हाला राजकारण करायचे नसून आम्ही निवडणूक ,सामाजिक, राजकारण याविषयावर बोलणार आहोत. तसेच शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होत होता. पण, बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे हा एकेरी उल्लेख बंद झाला. ही बाब आमच्या दृष्टीने महत्वाची असल्यामुळे आम्हला त्यांच्याबद्दल प्रेम होते, असे शिवसेनेचे ठाणे प्रवक्ते चिंतामणी कारखानीस यांनी सांगितले.

आनंदमठ हे आनंदमठच राहील
ठाण्यातील टेंभीनाका येथील आनंद आश्रमामध्येच शिंदे गटाकडून शिवसेना भवन उभारण्यात येणार असल्याचे बोलले जात असून याबाबत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, आनंद मठाचे दरवाजे सर्वपक्षीय नेत्यांसाठी खुले होते आणि यापुढेही खुले राहतील. शिवसेनाप्रमुखांनी दादर येथे शिवसेना भवन उभारले होते आणि ते एकच सेना भवन आहे. आनंदमठ हे आनंदमठच राहील, असे त्यांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरे यांची सभा ठाण्यात होणार असून ती कधी आणि कुठे घ्यायची याबाबत ठरलेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.