scorecardresearch

ठाणे : पिंपळाचे वृक्ष तोडल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल

याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे : पिंपळाचे वृक्ष तोडल्याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल
पिंपळाचे वृक्ष तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल (संग्रहित छायाचित्र)

ठाणे : खोपट येथील एका खासगी रुग्णालयाच्या बांधकामादरम्यान रुग्णालय प्रशासनाने पिंपळाचे वृक्ष तोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रुग्णालय व्यवस्थापकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागातील अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – ठाणे : काळू धरण नकोच, फसवणुकीच्या भावनेतून धरण क्षेत्रातील ग्रामस्थांचा मुरबाडमध्ये मोर्चा

हेही वाचा – डोंबिवलीत शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूती विभागातील महिलांचे एक हजार दिवस समुपदेशन

खोपट येथील एसटी महांडळाच्या बसथांब्याजवळ एका खासगी रुग्णालयाचे बांधकाम सुरू होते. त्यावेळी रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाच्या आवारात असलेले एक पिंपळाचे वृक्ष तोडले होते. त्याची तक्रार डिसेंबर महिन्यात मनसेच्या एका पदाधिकाऱ्याने ठाणे महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या आधारे वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्याठिकाणाची पाहणी केली असता, तोडलेल्या पिंपळाच्या वृक्षाचा बुंधा आढळून आला. त्यामुळे येथे वृक्ष तोडण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात त्यांसदर्भात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे रुग्णालय व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 15:49 IST

संबंधित बातम्या