scorecardresearch

डोंबिवली : राज्यातील महिलांना मुख्यमंत्र्यांकडून भव्य भाऊबीज भेट ; शिवाजी पार्कपेक्षा पाच पट अधिकच्या मैदानावर शिंदे समर्थकांचा दसरा

मेळावा बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे दादा भुसे यांची माहिती

डोंबिवली : राज्यातील महिलांना मुख्यमंत्र्यांकडून भव्य भाऊबीज भेट ; शिवाजी पार्कपेक्षा पाच पट अधिकच्या मैदानावर शिंदे समर्थकांचा दसरा

दसरा मेळाव्यासाठी दादरचे शिवाजी पार्क मैदान समोरच्यांना मिळाले ते एकार्थाने बरे झाले. या मैदानाची आसनक्षमता फक्त ५० हजार आहे.डोंबिवलीतील बंदिस्त सभागृहातील दसरा मेळावा बैठकीसाठी बोलवलेल्या बैठकीला एका इमारतीमधील तीन सभागृह शिवसैनिकांनी खचाखच भरली असतील तर शिवाजी पार्क पेक्षा पाच पट अधिक आसन क्षमतेचे मैदान आम्हाला आता पहावे लागेल, अशी स्पष्टोक्ती राज्याचे बंदरे आणि खणीकर्म मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी येथे दिली.

हेही वाचा >>> बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

डोंबिवलीतील दसरा पूर्व मेळाव्याच्या बैठकीला महिलांची संख्या अधिक आहे. राज्यातील तमाम महिलांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारला पाठिंबा असल्याने हा सक्रिय पाठिंबा पाहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील तमाम महिलांसाठी येत्या दिवाळीला भव्य भाऊबीज भेट जाहीर करणार आहेत, असेही मंत्री भुसे यांनी सांगितले.येत्या दसरा मेळावा पूर्व शिवसैनिकांची बैठक आणि हिंदूगर्वगर्जना संपर्क यात्रेचे कल्याण जिल्हा शिवसेनेतर्फे आयोजन डोंबिवलीतील दावडी येथील पाटीदार भवन सभागृहात केले होते. यावेळी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे, आ. विश्वनाथ भोईर, आ. डाॅ. बालाजी किणीकर, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, माजी सभापती दीपेश म्हात्रे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, माजी महापौर विनीता राणे, शीतल म्हात्रे, संध्या वढावकर उपस्थित होते.

हेही वाचा >>> ठाणे : आनंदाश्रमासमोर शिवसैनिकांचा जल्लोष

दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कपेक्षा मोठे मैदान लागणार असल्याने ते मुंबईत नाही मिळाले तर ठाण्यात बघू. नाहीतर आमच्या नाशिकला दसरा मेळावा घेण्यात यावा. मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याचा पहिला दौरा शिंदे यांनी मालेगाव येथून सुरू केला होता. त्यामुळे ही संधी दिली तर त्याचे सोने करू, असे मंत्री भुसे म्हणाले.दीड महिन्यांपासून गद्दार, खोके, खंजिर, बाप काढणे असे प्रकार समोरच्यांकडून सुरू आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे वडील आहेत. त्यांच्या तसबिरी काढून तुम्ही निवडणुका लढवून दाखवा असे आव्हान दिले जाते. संकुचित विचारामुळे हे सुचते. याऊलट शिवसेनाप्रमुखांची तसबिर न लावता तुम्ही निवडणुका लढवून दाखवा. मग शिवसेनाप्रमुख कोणाचे बाप होते ते कळेल. आताचा शिवसैनिक हा शिवसेनाप्रमुख, धर्मवीर आनंद दिघे यांच्या धगधगत्या विचारांचा आहे. पदोपदी त्यांनी या दैवतांना समोर ठेऊन कामे केली आहेत. त्यामुळे शिवसेनाप्रमुख हे राज्यातील तमाम निष्ठावान शिवसैनिकांचे बाप होते. शासनाने अध्यादेश काढून त्यांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा दिला आहे, असे मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंकडून नव्या नेमणुका ; किशोर पाटील यांची बदलापूर शहरप्रमुखपदी निवड

निवडणुका आल्या की समोरच्यांना शिवाजी महाराज आठवतात. संपल्या की महाराजांना विसरुन जातात. हिम्मत असेल तर यांनी महाराजांची तसबिर न लावता निवडणुका लढवाव्यात मग जनताच योग्य निर्णय घेऊन योग्य निवड करेल. शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाल्याने राज्यातील जनता खूष आहे. यांच्या पोटात गोळा उठला आहे अशी टीका भुसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर केली. आम्ही गद्दार असतो तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या समर्थनासाठी लाखोचा जनसागर जमला असता का, असे प्रश्न मंत्री भुसे यांनी केले.सामान्यांना नजरेसमोर ठेऊन सरकार गतिमानतेने निर्णय घेत आहे. निर्णय लहान असले तरी त्यात सामान्यांचे हीत आहे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. येत्या पालिका निवडणुकांमध्ये ठाणे जिल्ह्यातील पालिकांवर भगवा फडकेल. आताची गर्दी हे त्याचे द्योतक आहे, असे खा. शिंदे म्हणाले.

विजय साळवींवर टीका
कल्याणचे शहरप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी करोनाने आजारी असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळी कीट घालून त्यांना पाहण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यांना धीर दिला. तेच बंड्या साळवी आता उलटले आहेत, अशी टीका राहुल लोंढे यांनी केली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dussehra gathering of shinde supporters on ground five times bigger than shivaji park amy

ताज्या बातम्या