डोंबिवली – शिळफाटा रस्त्यावरील पलावा येथून कल्याण पश्चिमेतील राज्य परिवहन महामंडळाच्या बस आगारात रिक्षेतून येत असताना एका महिला प्रवाशाची सोन्याचा ऐवज, रोख रक्कम असा आठ लाखाचा ऐवज असलेली पिशवी आगाराजवळ उतरल्यावर रिक्षेत विसरली. महात्मा फुले पोलिसांनी सहा तास सलग तपास करून संबंधित रिक्षेचा शोध घेऊन संबंधित महिला प्रवाशाला ऐवजासह पिशवी परत केली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक महिला शकुंतला कुरकुटे या डोंबिवलीतील पलावा येथे आपल्या नातेवाईकाकडे आल्या होत्या. शुक्रवारी त्या पलावा येथून रिक्षेने कल्याणमधील महाराष्ट्र राज्य परिवहन महाममंडळाच्या बस स्थानकाजवळ आल्या. घाईगडबडीत उतरताना त्यांच्या जवळील ११ तोळे सोन्याचे दागिने, मोबाईल, रोख रक्कम असलेली पिशवी रिक्षेत राहिली. रिक्षा चालक घटनास्थळावरून निघून गेल्यावर त्यांना आपली पिशवी रिक्षेत विसरल्याचे लक्षात आले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा >>>कल्याणमध्ये भाजप बंडखोर वरूण पाटील यांचा महायुतीचे काम करण्याचा निर्णय

शकुंतला कुरकुटे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात जाऊन घडला प्रकार सांगितला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विलास मडके यांच्या पथकाने पलावा ते कल्याण बस स्थानकापर्यंतचे सर्व सीसीटीव्ही चित्रण तपासले. सहा तास ही पाहणी सुरू होती. या पाहणीनंतर सीसीटीव्ही चित्रण तपासून पोलिसांनी संबंधित रिक्षा वाहन क्रमांकाच्या आधारे त्या रिक्षा चालकाचा शोध घेतला. त्यांच्या रिक्षेत महिला प्रवासी विसरलेली पिशवी ताब्यात घेतली. पिशवीतील ऐवजाला कोणीही हात लावला नव्हता. तक्रारदार शकुंतला कुरकुटे यांना त्यांची सोन्याचा ऐवज असलेली पिशवी वरिष्ठ पोलीस निरीक्षक साबळे यांच्या हस्ते परत करण्यात आली. या शोध कार्यात हवालदार मनोहर चित्ते, किशोर सूर्यवंशी, आनंद कांगरे, दीपक थोरात, महेंद्र मंझा यांनी सहभाग घेतला.

Story img Loader