Premium

ठाणे मतदारसंघाचा निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; शंभूराज देसाई यांचे मत

ठाणे लोकसभेसह राज्यातील इतर मतदार संघातून महायुतीतील कोणता पक्ष निवडणूक लढणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत अशी माहिती ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

minister shambhuraj desai claims No More Bias in fund allocation
शंभुराज देसाई (संग्रहित छायाचित्र)

ठाणे : कल्याण लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हेच निवडणूक लढवतील. तर ठाणे लोकसभेसह राज्यातील इतर मतदार संघातून महायुतीतील कोणता पक्ष निवडणूक लढणार याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार आहेत अशी माहिती ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. तसेच आगामी विधानसभा निवडणूकीत महायुती २०० पेक्षा जागा जिंकेल असा दावाही त्यांनी यावेळी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शंभूराज देसाई मंगळवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर होते. त्याआगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूका महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जाणार आहेत. त्यामध्ये शिवसेना, भाजप आणि इतर नऊ पक्षांचा समावेश आहे. ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एकाच दिवशी १८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यासंदर्भाचा चौकशी अहवाल लवकरच येणार आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असेही देसाई म्हणाले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Eknath shinde devendra fadnavis will decide on thane loksabha seat shamburaj desai ysh

First published on: 27-09-2023 at 01:28 IST
Next Story
आमदार जितेंद्र आव्हाड नेहमी सोयीचा इतिहास सांगतात, अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांची टीका