Mumbai BMC Results 2026 / ठाणे : मुंबईत महायुती बहुमताच्या दिशेने गेली असताना भाजप आणि शिंदे गट सत्तास्थापनेच्या तयारीत आहेत. परंतु भाजपला शिंदे यांना सोबत घेऊनच सत्ता स्थापन करावी लागले. मुंबईत महापौर पदाच्या दाव्याविषयी एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. नेमके शिंदे काय म्हणाले पाहूया.
ठाणे महापालिकेत महायुतीचे १०० हून अधिक उमेदवार निवडून आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभीनाका येथील आनंद आश्रमातून माध्यमांशी संवाद साधला. ठाण्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. मुंबईत महायुतीला बहुमत मिळेल. राज्यभरात सर्वाधिक भागात महायुतीच्या बाजूचे वातावरण आहे. महानगरात महायुतीला जागा मिळाल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आम्ही विकासाचा अजेंडा राबविला आहे. काहीजणांनी ही निवडणूक भावनेच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. परंतु मुंबईकरांनी विकासाला स्विकारले असून विकासाला नाकारणाऱ्यांना मुंबईकरांनी नाकारले आहे. विकास हाच ब्रँड आम्ही स्विकारला आहे. मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई शहर जागतिक दर्जाचे शहर झाले पाहिजे असे ते वारंवार म्हटले. त्यादिशेने आमचा प्रयत्न सुरु असल्याचेही शिंदे म्हणाले.
महापौरपदाच्या दाव्याविषयी एकनाथ शिंदे यांना विचारले असता महापौरपद, सत्तेऐवजी मुंबईत आम्हाला बदल घडवायचा असल्याचे ते म्हणाले. मुंबईकर पुन्हा मुंबई आला पाहिजे यासाठी आम्हाला प्रयत्न करायचे आहे. मुंबईत २५ वर्ष कारभार केला. त्यांच्या कारभारावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेना भाजपला बहुमत दिले मिळाले असे शिंदे म्हणाले.
एमआएमचे उमेदवार निवडून आल्याने शिंदे म्हणाले की, समाजाविरोधात, समाजविघातक बोलत असणारे निवडून येणे चिंताजनक असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
