-जयेश सामंत

गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट भूमिका घेत हा प्रश्न मार्गी काढला आहे. सध्या राज्यामध्ये सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षादरम्यान नवी मुंबई विमानतळाला दिवंगत दि. बा. पाटील यांचं नाव देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी होकार दिला आहे. यासंदर्भातील माहिती प्रकल्पग्रस्तांनी दिली आहे आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय एकनाथ शिंदेंनी दिलेल्या प्रस्तावाच्याविरोधात आहे. या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून विचाराधीन होता. एकनाथ शिंदे यांनीच गेल्या वर्षी यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. मात्र, यावरून स्थानिकांनी मोठा विरोध दर्शवला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विमानतळ प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक सर्व समाजातील लोकांना मातोश्रीवर बोलावून त्यांची भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याला होकार असल्याचं कळवलं आहे. “भूमिपुत्रांची इच्छा होती. ती इच्छा आज उद्धव ठाकरेंनी पूर्ण केली आहे. आम्ही अनेकदा विनंती केली होती, पत्रं पाठवली होती. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सर्व समाजाच्या लोकांना मातोश्रीवर बोलवलं आणि तुमची जी इच्छा आहे, भावना आहेत, त्यांचा सन्मान राखून नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचं निश्चित केलं”, अशी माहिती विमानतळ प्रकल्पग्रस्तांनी दिली.

ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आगरी कोळी समाज आहे. या भागातील भूमिपुत्र अशी या समाजाची ओळख. नवी मुंबई प्रकल्प्रागठांचे आंदोलनात दि. बा. पाटील यांनी निर्णायक भूमिका वठवली होती. जसाई येथे झालेल्या आंदोलनात आगरी समाजातील काही युवकांना प्राण गमवाव लागला. त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले अणि दि. बा. यांनी ते मोठ्या हिमतीने मोठे केले. त्यानंतर राज्य सरकारने प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के भूखंड योजना सुरू केली. हे आंदोलन आणि दि. बा. यांच्याविषयी प्रकल्पग्रस्तच्या भावना नेहमीच तीव्र राहिल्या आहेत.

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

एकनाथ शिंदे यांनी डिसेंबर २०२० मधे सिडकोमार्फत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा ठराव मंजूर करून घेतला आणि प्रकल्पग्रस्तचं आंदोलन पेटले. या आंदोलनाची मोट बांधण्यात भाजपाच्या काही नेत्यांची भूमिका निर्णायक ठरल्याची चर्चा होती. तरीही प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाला अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळताना पाहायला मिळाला. हे आंदोलन जसे वाढत घेले तसे एकनाथ शिंदे यांच्या विरोधात जाहीर भूमिका घेताना प्रकल्पग्रस्त आंदोलनाचे नेते दिसू लागले.

नक्की वाचा >> “शिवसेनेचे बंडखोर आमदार दलित आणि वंचितविरोधी, ते हिंदूत्वही मानत नाहीत कारण, कारण तसं असतं तर…”

काळव्यातील दशरथ पाटील वगैरे नेत्यांनी हे आंदोलन अधिक तीव्र कसे होईल याकडे लक्ष दिले. ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजात याबद्दल तीव्र भावना असताना शिंदे यांच्या बंडनंतर उद्धव यांनी ही भूमिका घेत मोठी खेळी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde political crisis uddhav thackeray agree to naming navi mumbai airport as di ba patil airport scsg
First published on: 28-06-2022 at 17:14 IST